इर्शाळवाडीवर भूस्खलनामुळे मोठी जिवीत हानी झाली आहे. तसेच अनेक जखमींवर उपचार देखील सुरू झाले आहेत. या भीषण दुर्घटनेत जखमी आणि वाचलेल्या ग्रामस्थांसाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते शुक्रवार, २१ जुलै रोजी मोठी मदत घेऊन निघाले. दोन मोठ्या टेम्पोंमधून ही मदत इर्शाळवाडी पर्यंत पोहचवली जाणार आहे.
या मदतीमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचे सर्व अत्यावश्यक कपडे, खाण्यासाठी सुका खाऊ तसेच विविध अन्नपदार्थ, ग्रामस्थांसाठी तसेच मदतकार्य करणाऱ्या प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागणारे सर्व जीवनाश्यक पदार्थ आणि वस्तूंचा यात समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता ही मदत लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वार येथून इर्शाळवाडीकडे रवाना झाली.
View this post on Instagram
(हेही वाचा – Ashish Shelar : अनधिकृत शाळांची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करा; आशिष शेलार यांची मागणी)
रायगड जिल्ह्यातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर बुधवार १९ जुलै रोजी रात्री उशिरा दरड (Irshalgad Landslide) कोसळली. ही दरड कोसळल्याने अनेक कुटुंब मलब्याखाली अडकले आहेत. आतापर्यंत या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून १०३ जणांना वाचवण्यात यश आहे आहे. मात्र अजूनही अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत आहे. आज म्हणजेच शुक्रवार २१ जुलै रोजी सकाळपासूनच इर्शाळवाडीस पावसाला सुरुवात झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community