Lalbaug Bus Accident : मद्यधुंद प्रवाशाची चालत्या बसमध्ये चालकाशी झटापट; लालबागमधील भीषण अपघातात 9 प्रवासी जखमी

370
Lalbaug Bus Accident : मद्यधुंद प्रवाशाची चालत्या बसमध्ये चालकाशी झटापट; लालबागमधील भीषण अपघातात 9 प्रवासी जखमी
Lalbaug Bus Accident : मद्यधुंद प्रवाशाची चालत्या बसमध्ये चालकाशी झटापट; लालबागमधील भीषण अपघातात 9 प्रवासी जखमी

बेस्टची 66 क्रमांकाची बस राणी लक्ष्मी चौकाच्या दिशेने जात असताना गणेश टॉकीजच्या दरम्यान एका मद्यधुंद प्रवाशाने वाहकाबरोबर झटापट केली. त्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि बस अनियंत्रित होऊन फुटपाथच्या दिशेने गेली. या दरम्यान, फुटपाथवरून जाणारे काही पादचारी जखमी झाल्याचं समजलं आहे. पोलिसांनी बसमधील दारुड्या प्रवाशाला ताब्यात घेतले आहे. वाहक आणि चालक यांना काळाचौकी पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे, अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. (Lalbaug Bus Accident)

(हेही वाचा – Pune Crime: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची भरचौकात गोळ्या झाडून हत्या!)

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST) उपक्रम ही बृहन्मुंबई महानगरपालिकेची (BMC) वाहतूक शाखा आहे. १ सप्टेंबरच्या रात्री एका मद्यधुंद प्रवाशाने ड्रायव्हरसोबत झटापट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या प्रवाशाने ड्रायव्हरकडून स्टेअरिंग हिसकावून घेतले, त्यामुळे बस अनियंत्रित होऊन हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

पादचारी, कार आणि दुचाकींना धडक

एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत जखमी झालेल्या नऊ पादचाऱ्यांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. मद्यधुंद प्रवाशानं केलेल्या कृत्यामुळे बस चालकाचं वाहनावरील ताबा सुटल्याने शहरातील लालबाग परिसरात पादचारी, कार आणि दुचाकींना धडक बसली. काळाचौकी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पिअर येथून एक इलेक्ट्रिक बस सायनमधील राणी लक्ष्मीबाई चौकाकडे जात असताना ही घटना घडली.

लालबाग येथील गणेश टॉकीज परिसरात बस पोहोचली आणि तेवढ्या त्या प्रवाशानं अचानक स्टेअरिंग पकडले. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं. अनियंत्रित बसने दोन मोटारसायकल, एक कार आणि अनेक पादचाऱ्यांना धडक दिल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात आतापर्यंत नऊ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेतील तीन जण गंभीर जखमी आहेत. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना शहरातील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. (Lalbaug Bus Accident)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.