नवसाला पावणारा गणपती बाप्पा म्हणून लालबागच्या राजाची जगभरात ओळख आहे. तब्बल २२ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले आहे. गिरगाव चौपाटीवर लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला.
लालबाग राजा विसर्जन सोहळा
गिरगाव चौपाटीवर दाखल झाल्यानंतर समुद्राचं पाणी उडवत समस्त कोळी बांधवांनी राजाला मानवंदना दिली. यानंतर विशेष सजवलेल्या तराफ्यातून थाटामाटात लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा समुद्रात सुरू झाला. खोल समुद्रात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी अनेक कार्यकर्ते, गणेशभक्त भावूक झाल्याचे चित्र चौपाटीवर पहायला मिळाले. दोन वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सव राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईतील लालबाग असो किंवा पुण्यातील लक्ष्मीरोड, अलका चौक असो ठिकठिकाणी भक्तांची मोठी गर्दी झाली होती.
यांत्रित तराफ्याच्या साहाय्याने लालबाग राजाला समुद्रात निरोप दिला जातो. तब्बल २२ तासांच्या उत्साहपूर्ण मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे गिरगाव समुद्रात शाही विसर्जन करण्यात आले. यावेळी चौपाटीवर पोलिसांच्या तुकड्याही तैनात होत्या.
Join Our WhatsApp Community