ही शान कोणाची लालबागच्या राजाची, लालबागच्या राजाचा विजय असो….. अशा जयघोषात लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja Visarjan 2024) विसर्जन करण्यात आले आहे. लालबागच्या राजाची मिरवणूक बुधवारी सकाळी 10.30 च्या सुमारास सुरु झाली होती. २३ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. या वेळी चौपाटीवर अलोट गर्दी लोटली होती. यानंतर समुद्रात ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…’च्या गजरात ‘लालबागच्या राजा’चे विसर्जन करण्यात आले. (Lalbaugcha Raja 2024)
(हेही वाचा – Rohit Sharma on Gambhir : रोहित शर्माने ‘या’ दोन शब्दांत केलं गौतम गंभीरचं वर्णन)
गिरगाव चौपाटी परिसरात पहाटे पाचच्या सुमाराला मुसळधार पाऊस झाला आणि भर पावसातही विसर्जन सुरू होते. गिरगाव चौपाटी परिसरात चिंचपोकळीचा चिंतामणी आणि माजगावचा राजा सोबत लालबागच्या राजाची मिरवणूकही भर पावसात सुरूच होती. लालबागचा राजा सकाळी 6 च्या सुमारास गिरगावच्या चौपाटीवर दाखल झाला.
मुंबईतील (Mumbai) लालबागमध्ये मंगळवारी लालबागच्या राजाची आरती घेऊन मिरवणुकीला सुरूवात झाली. पारंपारिक वेषातच भाविकांनी या मिरवणुकीत भाग घेतला. हायड्रॉलिक्सचा वापर यांत्रिक तराफ्याच्या सहाय्याने लालबागच्या राजाला (Lalbaugcha Raja) खोल समुद्रात नेऊन निरोप दिला जातो. 22 तासांनंतरही गणेशभक्तांच्या उत्साहात कमी झालेला पाहायला मिळाला नाही. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मिरवणूक मार्गावर मुंबईकरांनी अलोट गर्दी केली होती. (Lalbaugcha Raja 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community