लालबागचा राजाच्या पायाशी ठेवलेल्या या चिठ्ठीत सुधीर साळवी (Sudhir Salvi) 2024 ला आमदार होऊ दे, असे लिहिले आहे. ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवडी विधानसभा 2024 आमदार… सुधीर (भाऊ) साळवी’, असा मजकूर या चिठ्ठीत लिहण्यात आला आहे. आगामी काळात लालबाग परिसरातील राजकारणाचा पट नव्याने मांडला जाऊ शकतो. लालबागचा परिसर हा शिवडी विधानसभा मतदारसंघात येतो. (Lalbaugcha Raja 2024)
(हेही वाचा – मद्यपी चालकाची Chandrakant Patil यांच्या वाहनाला धडक)
सुधीर साळवी आमदार होऊ दे
उबाठा गटाचे अजय चौधरी (Ajay Chaudhari) हे सध्या शिवडीचे आमदार आहेत. मात्र, लालबागच्या राजाच्या पायाशी ठेवलेल्या चिठ्ठीत सुधीर साळवी (Sudhir Salvi) 2024 ला आमदार होऊ दे, असे लिहण्यात आले होते. साळवी समर्थकांकडून लालबागच्या राजाच्या चरणी ही चिठ्ठी ठेवण्यात आलेली असू शकते.
सुधीर साळवी हे शिवडी विधानसभा संघटक, दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक म्हणून उबाठा गटाकडून काम करत आहेत, तर लालबागच्या राजाचे मानद सचिव देखील सुधीर साळवी आहेत.
विसर्जनाच्या पहाटे साळवी समर्थकांकडून राजाच्या चरणी ही चिठ्ठी ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. शिवडी विधानसभेमध्ये सध्या अजय चौधरी ठाकरे गटाकडून आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी इमान कायम राखणाऱ्या आमदारांमध्ये अजित चौधरी यांचा समावेश होता. अजय चौधरी यांच्यासह सुधीर साळवी हे देखील शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. सुधीर साळवी लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाचे सचिवही आहेत. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले होते. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यापैकी कोणाला उमेदवारी दिली जाणार, हे पाहावे लागेल. (Lalbaugcha Raja 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community