प्रभू श्रीरामांच्या बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्यानगरी (Ayodhya Shri Ram Mandir) सजली आहे. उद्या (सोमवार २२ जानेवारी) होणाऱ्या सोहळ्यासाठी तयारी पूर्ण होत आली आहे. अशातच शनिवार २० जानेवारी या अनुष्ठानाच्या पाचव्या दिवशी पहाटे शर्कराधिवास, फलाधिवास हे विधी करण्यात संपन्न झाले. त्यानंतर संध्याकाळी पुष्पाधिवास विधी पार पडला.
(हेही वाचा – Ayodhya Shri Ram Mandir : २२ जानेवारी रोजी अयोध्या १० लाख दिव्यांनी उजळणार)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा उत्सवासाठी सर्व क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी (Ayodhya Shri Ram Mandir) तब्बल ८००० लोकांना आंमत्रित करण्यात आले आहे. तर ५०६ लोकांना राज्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Actor Pradeep Rawat : गजनी चित्रपटातला खलनायक प्रदीप रावत बद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?)
लालबागच्या राजाला आमंत्रण –
अशातच लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला (Ayodhya Shri Ram Mandir) देखील आमंत्रण देण्यात आले आहे. अयोध्येच्या सोहळ्यासाठी सार्वजनिक मंडळाला निमंत्रण मिळालेले लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ हे देशातील एकमेव मंडळ ठरलं आहे. विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आणि मानद सचिव सुधीर साळवी यांना लालबाग येथील मंडळाच्या कार्यालयात भेट घेऊन प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे.
(हेही वाचा – Manoj Jarange : ‘२६ जानेवारीपर्यंत तोडगा काढा’; जरांगेंचा सरकारला इशारा)
ऐतिहासिक कार्यक्रम भव्य, दिव्य आणि सुरक्षित पार पडण्याची तयारी पूर्ण
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की,या सोहळ्यासाठी (Ayodhya Shri Ram Mandir) संपूर्ण अयोध्या धाम, उत्तर प्रदेश आणि देशात उत्साहाचे वातावरण आहे. अनेक शतकांनंतर येणारा हा क्षण पाहण्यासाठी भाविक आतुर झाले आहे. भारताचा विश्वास आणि अभिमान पुन्हा प्रस्थपित करण्याचा हा कर्यक्रम आहे. उत्तम समन्वय, स्थानिक पातळीवर ट्रस्टशी समन्वय, सुविधा, वाहतूक, सुरक्षा आदींच्या माध्यमातून २२ जानेवारीचा ऐतिहासिक कार्यक्रम भव्य, दिव्य आणि सुरक्षित पार पडण्याची तयारी पूर्ण झाली असल्याचे योगी यांनी सांगितले. (Ayodhya Shri Ram Mandir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community