शिवराज्याभिषेक सोहळ्याला पुढील वर्षी 350 वर्षी पूर्ण होणार आहेत. (Lalbaugcha Raja 2023) त्यामुळे लालबागचा मंडपात रायगडाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राजाच्या व्यासपीठावर देखील तितकाच सुंदर देखावा साकारण्यात आला आहे. यंदा लालबागचा राजा हा मेघडंबरीवर विराजमान झाला आहे. देशभरातील लाखो भाविकांना 15 सप्टेंबर रोजी लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन घडले. यंदा लालबागच्या राजाचा दरबारात रायगडाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. ही कलाकृती कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची अखेरची कलाकृती आहे. लालबागच्या राजाचे हे 90 वे वर्ष आहे. त्याचप्रमाणे लालबागनगरी देखील सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे.
(हेही वाचा – PM Modi Birthday : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयुष्मान भारत योजनेला चालना)
दरवर्षी कला दिग्दर्शक नितीन देसाई लालबागच्या राजाच्या दरबाराची संकल्पना साकारत असत. दरवर्षी लालबागच्या राजाचा मंडप हा वेगवेगळ्या पद्धतीने सजवण्यात येतो. मागील वर्षी राजाच्या मंडपात राममंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती. कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी यंदा लालबागच्या दरबारात साकारलेली लालबागच्या राजाची प्रतिकृती ही शेवटची ठरली. शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी जो शिवरायांचा दरबार होता तो तयार करण्याचा प्रयत्न यंदा करण्यात आला आहे. तसेच शिवरायांच्या 32 मण सोन्याच्या सिंहासनाची प्रतिकृती देखील या वेळी साकारण्यात आली आहे. (Lalbaugcha Raja 2023)
या मंडपात शिवरायांच्या राजमुद्रेची देखील प्रतिमा साकारण्यात आली आहे. महाद्वारावर आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलीये. तर प्रथम दर्शन सोहळ्यावेळी शिवकालीन नृत्याविष्कार सादर करण्यात आला. दरवर्षी लाखो भाविक लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लालबागनगरीत येत असतात. अनेक दिग्गज मंडळीदेखील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.
यंदा इर्शाळवाडीतील पीडितांना मदत
गणपती बाप्पाच्या अशा भक्तांसाठी मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. ‘पान-सुपारी’ हा त्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि लालबागच्या राजाच्या परंपरेतील महत्त्वाचा कार्यक्रम असतो. ‘पान-सुपारी’मध्ये मंडळाकडून आपले सामाजिक दायित्व जपले जाते. लालबागचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्य असणारा ‘पान-सुपारी’ कार्यक्रम २४ सप्टेंबर रोजी राजाच्या दरबारात होणार आहे. यंदा दरडग्रस्त इर्शाळवाडीतील पीडितांना मदत करून दुर्घटनेमध्ये मदत केलेल्या हातांचा सन्मान केला जाणार आहे. या वेळी इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांना सढळ हस्ते आर्थिक मदत देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. शिवाय, पीडितांच्या पुनर्वसनातनदेखील सहकार्य केले जाणार आहे. याशिवाय या दुर्घटनेत आपल्या जीवाची बाजी लावून मदत करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मानदेखील केला जाणार आहे. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. (Lalbaugcha Raja 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community