Lalit Patil: ड्रगमाफिया ललित पाटीलला मेफेड्रॉनचा फॉर्म्युला कोणी सांगितला ? वाचा सविस्तर

फॉर्म्युला ललितने भूषणला दिल्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये मेफेड्रॉनचा कारखाना सुरू केला

114
Lalit Patil: ड्रगमाफिया ललित पाटीलला मेफेड्रॉनचा फॉर्म्युला कोणी सांगितला ? वाचा सविस्तर
Lalit Patil: ड्रगमाफिया ललित पाटीलला मेफेड्रॉनचा फॉर्म्युला कोणी सांगितला ? वाचा सविस्तर

ड्रगमाफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर त्याला पळवलं की, तो पळाला यापासून त्याच्याशी संबंधित इतर अनेक बातम्यांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं आहे. नेमका त्याला मेफेड्रॉनचा फॉर्म्युला कोणी सांगितला. तो ससून रुग्णालयात येण्यापूर्वी येरवडा कारागृहात होता. तिथे त्याला एमडीच्या फॉर्म्युल्याविषयी सांगणारं कोण भेटलं, याविषयी पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयाला माहिती दिली.

केमिकल इंजिनियर अरविंदकुमार प्रकाशचंद्र लोहारे यांनी ललित पाटील याला येरवडा कारागृहात मेफेड्रॉन (एमडी) तयार करण्याचा फॉर्म्युला दिला, तो फॉर्म्युला ललितने भूषणला दिल्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये मेफेड्रॉनचा कारखाना सुरू केला. त्यातून अमली पदार्थ तस्करीला सुरुवात झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : श्री ब्राम्हणदेव कृपा इमारतीतील १७५ कुटुंबांना मिळणार दिलासा )

चाकण येथील अमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यात ललितला अटक केली होती. त्यानंतर ललित आणि लोहारे यांची येरवडा कारागृहात भेट झाली. त्यावेळी लोहारे याने ललितला मेफेड्रॉन तयार करण्याचा फॉर्म्युला सांगितला. लोहारे सध्या येरवडा कारागृहात आहे. त्याचीही आता ललित पाटील अटकेबाबत चौकशी होणार आहे.

ललितचा भाऊ भूषण पाटील ललितचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांची पोलिस कोठडीची मुदत आज संपत आली होती. त्यांना शुक्रवारी (ता. २०) न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर असून, गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी भूषण आणि बलकवडेच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सहायक सरकारी वकील निलीमा यादव- इथापे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करत दोघांच्या पोलिस कोठडीत २२ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली असून ललितच्या अजून दोन साथीदारांचाही पोलिसांना शोध लागला आहे. झिशान शेख आणि रोहन ऊर्फ गोलू अन्सारी अशी त्यांची नावे आहेत. ते अनुक्रमे येरवडा आणि तळोजा कारागृहात आहेत. याबाबत त्यांच्याकडेही तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.