राजापूर, रत्नागिरी आणि लांजा या जिल्ह्यांमधील जनावरांना मोठ्या प्रमाणात लम्पी (Lampi Virus) या आजाराची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. या जिल्ह्यांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव वाढला असून ५ तालुक्यांमधील १३८ गावांतील ६०६ जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. सर्वाधिक बाधित राजापूर, लांजा आणि रत्नागिरी या तीन तालुक्यांत असून लम्पीमुळे आतापर्यंत ६८ जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर १७८ जनावरे उपचारानंतर बरी झाली असून ३६० उपचाराखाली आहेत.
राज्यभरात लम्पीमुळे बाधित (Lampi Virus) जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या चार महिन्यांत लम्पीचा रत्नागिरी जिल्ह्यातील प्रादुर्भाव वाढत आहे. लम्पी नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीम आखण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २ लाख ६६ हजारांपैकी २ लाख ३५ हजार जनावरांना लस देण्यात आली आहे.
(हेही वाचा – Siddhivinayak Trust : सिद्धीविनायक ट्रस्टच्या अधिकारी नंदा राऊत यांच्या जागी नवी नियुक्ती)
राजापूर, रत्नागिरी आणि लांजा या तीन तालुक्यांत लम्पी (Lampi Virus) पसरण्यामागील कारण पशुसंवर्धन विभागाकडून शोधण्यात आले. यामध्ये काही परजिल्ह्यांतील जनावरांचा सहभाग होता. राज्यभरात सगळीकडेच लम्पीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्या स्पर्धांमधून कदाचित लम्पीचा प्रादुर्भाव झाला असावा, अशी शक्यता जिल्हा पशुसंवर्धन विभागाने वर्तविला आहे. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाला देण्यात आला असून जनावरे एकत्रित येणाऱ्या स्पर्धा किंवा या प्रकारचे नियोजन करू नये, असे आवाहन देखील पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. रत्नागिरी शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात लम्पीग्रस्त मोकाट जनावरे रस्त्यावरून हिंडताना दिसत आहेत. त्या जनावरांकडून अन्य जनावरांना (Lampi Virus) लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community