मुंबईत जिथे-जिथे अरुंद वसाहती, गल्ली तसेच झोपडपट्टी आहेत, त्या परिसरांमध्ये प्रखर दिवे (हायमास्ट) लावावेत किंवा पुरेसे प्रकाश देणारे विद्युत दिवे तरंगत्या आधारावर (हॅगिंग लाईट्स) लावावेत. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार संपूर्ण मुंबईत मिळून किमान ५०० हायमास्ट येत्या ३ महिन्यात उभारले जाणे आवश्यक आहे. जेणेकरुन, त्या-त्या वसाहती व परिसरातील नागरिकांना रात्रीच्यावेळी पुरेसा प्रकाश उपलब्ध होऊ शकेल.
( हेही वाचा : जी- 20 देशांच्या प्रतिनिधींनी दिली कान्हेरी लेण्यांना भेट)
महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेला मुंबई सुशोभीकरण प्रकल्प, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाना योजना, प्रधानमंत्री स्व-निधी योजना, माझी मुंबई – स्वच्छ मुंबई मोहीम आदींचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्यासमवेत सर्व सह आयुक्त, परिमंडळांचे उप आयुक्त, संबंधित खात्यांचे सह आयुक्त तथा उप आयुक्त, सर्व सहायक आयुक्त आणि संबंधित खाते प्रमुख यांची शुक्रवारी १६ डिसेंबर २०२२ ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली आह, त्यावेळी ते बोलतांना महापालिका प्रशासक चहल यांनी हे निर्देश दिले.
संपूर्ण मुंबईतील सार्वजनिक प्रसाधनगृहांची नियमित देखभाल, स्वच्छता होण्यासाठी धोरण तयार करण्यात येत असून त्यासाठी आवश्यक सांख्यिकी व माहिती संकलित करण्यात येत आहे. सर्व सार्वजनिक प्रसाधनगृहे २४ बाय ७ तत्त्वावर चांगल्या पद्धतीने स्वच्छ राखली गेली पाहिजेत, यादृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करावयाची आहे. तसेच ज्या वसाहती तथा परिसरांमध्ये आवश्यक आहे, तिथे नवीन प्रसाधनगृहे बांधण्याची कार्यवाही सुरु करावी. त्याचप्रमाणे खास व फक्त महिलांसाठी राखीव असलेली व त्यानुरुप सर्व सुविधा समाविष्ट असलेली किमान २०० प्रसाधनगृहे मुंबईत तयार करायची आहेत. त्यामुळे सर्व विभाग कार्यालयांनी आपल्या स्तरावरील आवश्यक संख्या निश्चित करावी.
सार्वजनिक प्रसाधनगृहांसाठी तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांसाठी ज्या परिसरांमध्ये जागा उपलब्ध करुन घेताना पुनर्वसन आवश्यक असेल, त्या नागरिकांना योग्य जागा किंवा मोबदला देता यावा, यासाठी प्रचलित धोरणामध्ये योग्य तो बदल करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी,असेही निर्देश चहल यांनी दिले आहे.
Join Our WhatsApp Community