शीव रुग्णालयातील महानगर रक्तपेढीची जागा महापालिकेच्या ताब्यात

याचिका फेटाळल्यामुळे महानगर रक्तपेढी उभारण्यासाठी नॅकोला प्रदान करण्यात आलेल्या ५,६१० चौरस मीटरच्या जागेचा ताबा परत मिळवण्यासाठी यापूर्वीचा स्थायी समिती व महापालिकेचा ठराव रद्द करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. 

मुंबई महापालिकेच्या शीव रुग्णालयाच्याा अखत्यारित येणाऱ्या जुन्या बराकीतील महानगर रक्तपेढीची जागा महापालिकेच्या ताब्यात घेतली जात आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी तत्कालिन केंद्रातील काँग्रेस सरकारने पुढाकार घेवून राज्य सरकारला निर्देश देत ही रक्तपेढी बनवली होती. परंतु ‘नॅको’ला प्रदान करण्यात आलेली जागा महापालिकेने पुन्हा आपल्या ताब्यात घेवून याठिकाणी शीव रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीच्या पुनर्विकासासाठी या जागेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

२५ जानेवारी २०११ रोजी भूखंडासाठी विनंती केलेली!

महापालिकेच्या शीव येथील लोकमान टिळक रुग्णालयाच्या मुख्य परिसरातील जुन्या बराकीच्या जागेत भारत सरकार आणि नॅको यांनी सेंटर ऑफ एक्सेलन्स इन टान्सप्युझन मेडिसनी तथा महानगर रक्तपेढी स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला. जेणेकरून मुंबईतील रुग्णालयांना असलेला रक्त आणि रक्त घटकांचा तुटवडा दूर होऊन रुग्णांच्या गरजेनुसार योग्य रक्तघटक उपलब्ध होईल, असा उद्देश होता. या अनुषंगाने हा उपक्रम राबवण्यासाठी १ ऑक्टोबर २०१० मध्ये तत्कालिन केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी तत्कालिन मुख्यमंत्र्यांना मुंबईमध्ये महानगर रक्तपेढी उभारण्यास भूखंड उपलब्ध करून देण्याबाबत कळवण्यात आले होते. त्यानुासर शासनाच्या व मुंबई महापालिकेच्या परिसरात केंद्र शासन आणि नॅकोकडून प्राप्त होणाऱ्या निधीचा वापर करून या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनुसार महापालिकेच्या अखत्यारित भूखंड देण्याची विनंती २५ जानेवारी २०११ रोजी महापालिकेला करण्यात आली होती.

(हेही वाचा : चक्रीवादळात पडलेल्या ‘त्या’ झाडांच्या खड्ड्यांना नवसंजीवनी!)

५,६१० चौरस मीटरच्या जागेवर रक्तपेढी होती!

त्यानुसार शीव रुग्णालयाच्या जुन्या बराकीतील ५,६१० चौरस मीटरच्या जागेवर केंद्र शासन व आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेतून प्राप्त होणारा निधी वापरुन सेंटर ऑफ एक्सलेन्स इन ट्रान्सफ्युजन मेडिसीन तथा महानगर रक्तपेढी बांधकाम केंद्र शासन आणि राष्ट्रीय ए्डस नियंत्रण संघटनेकडून करून घेणे व रक्तपेढी पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार या जागेत २८ सप्टेंबर २०११ रक्तपेढी कार्यान्वित करण्यात आली. शीव रुग्णालयाची जागा ही रुग्णालय कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवास्थान जुने बराकी, अर्बन हेल्थ सेंटर, धारावी तसेच शीव कोळीवाडा कामगार वसाहत इत्यादी ठिकाणी येतात. यापैकी शीव रुग्णालयाच्या जुने बराकी नावाने ओळखल्या जाणाऱ्या जुने बराकी क्षेत्रफळ १६,३४३ चौरस मीटरचे असून हा भूखंड रुग्णालयांच्या विस्तार व विकासासाठी आरक्षित आहे. परंतु हस्तांतरीत करण्यात आलेल्या ५,६१० चौरस मीटरच्या सीमांकीत केलेल्या जागेमध्ये बैठ्या चाळी असून या चाळीमध्ये ‘पॅराप्लेजिक फाऊंडेशन’ ही संस्था कार्यान्वित आाहे. या संस्थेला पर्यायी जागा देऊन स्थलांतरीत करण्यासाठी टी चाळ किंवा रावळी प्रसुतीगृहाच्या जागेत पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय रुग्णालय व्यवस्थापनाने घेतला होता. परंतु त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, या भूखंडाच्या जागेवर पुनर्विकास योजना राबवली जात असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे या संस्थेची याचिका फेटाळल्यामुळे महानगर रक्तपेढी उभारण्यासाठी नॅकोला प्रदान करण्यात आलेल्या ५,६१० चौरस मीटरच्या जागेचा ताबा परत मिळवण्यासाठी यापूर्वीचा स्थायी समिती व महापालिकेचा ठराव रद्द करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here