Revenue Department : गावठाण क्षेत्राचा विस्तार करून जमिनीच्या नोंदी अद्ययावत करणार ; महसूल मंत्री बावनकुळे यांचं वक्तव्य

43
Revenue Department : गावठाण क्षेत्राचा विस्तार करून जमिनीच्या नोंदी अद्ययावत करणार ; महसूल मंत्री बावनकुळे यांचं वक्तव्य
Revenue Department : गावठाण क्षेत्राचा विस्तार करून जमिनीच्या नोंदी अद्ययावत करणार ; महसूल मंत्री बावनकुळे यांचं वक्तव्य

राज्यातील गावठाण क्षेत्राचा विस्तार करून त्याच्या नोंदी अद्ययावत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामपंचायतींना उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध होणार असून गावठाण क्षेत्राचा विकास अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

प्रथम टप्प्यात गावठाण क्षेत्राचा विस्तार करून त्या जमिनींच्या नोंदी तयार केल्या जातील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात या क्षेत्राच्या नियोजन व विकासाबाबत स्वतंत्र निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूल विभागाने (Revenue Department) दिली आहे.

(हेही वाचा – Sharad Pawar शाडो कॅबिनेटच्या माध्यमातून काँग्रेस-ठाकरे सेनेला शह देणार?)

राज्यात काही गावठाणांचा विस्तार पथदर्शी प्रकल्प म्हणून राबवण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक माहिती नगररचना विभागाने सादर करावी, असे निर्देश मंत्री बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिले आहेत.

या निर्णयामुळे गावठाण क्षेत्रातील रहिवाशांना अधिकृत नोंदी मिळतील आणि त्याचा फायदा त्यांच्या मालमत्तेच्या व्यवहारांसाठी होईल. तसेच, ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या कराच्या उत्पन्नात वाढ होईल. महसूल विभागाच्या (Revenue Department) या निर्णयामुळे ग्रामविकासाला गती मिळणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.