- ऋजुता लुकतुके
रेंज रोव्हर इव्होक गाडीला स्वत:ची अशी बाजारपेठ आहे आणि चाहते नवीन मॉडेलची वाट पाहत आहेत. (Land Rover Range Rover Evoque 2023)
इतर कंपन्यांप्रमाणेच लँड रोव्हर कंपनीनेही आपल्या कार अधिकाधिक इलेक्ट्रिक होतील याकडे लक्ष दिलं आहे. म्हणूनच नवीन वर्षांत कंपनीच्या रेंज रोव्हर इव्होक या कॉम्पॅक्ट एसयुव्ही गाडीत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात येत आहे. हे बदल रेंज रोव्हर इव्होकला अधिक आधुनिक बनवतील. हाय-ब्रिड असलेल्या या एसयुव्हीमध्ये जास्त क्षमतेची बॅटरी असेल आणि त्यामुळे मोठ्या पल्ल्यासाठी तुम्ही इ-कारचा वापर करू शकाल. (Land Rover Range Rover Evoque 2023)
इतर महत्त्वाचे बदल झाले आहेत ते डॅशबोर्डमध्ये. नवीन मोठा डॅशबोर्ड हा इलेक्ट्रिक म्हणजे टच स्क्रीन असलेला आहे. त्यामुळे बरीचशी जुनी बटनं आता हद्गपार झाली आहेत. नवीन डिस्प्ले ११.४ इंचांचा आहे. आणि यात आधीचे बरेचसे कंट्रोल आता डिजिटाईझ्ड झाले आहेत. तर गाडीची बॅटरी क्षमताही आधीपेक्षा वाढली आहे आणि चालकाच्या समोर असलेला कंसोलही आता आधुनिक झाला आहे. (Land Rover Range Rover Evoque 2023)
रेंज रोव्हरच्या डिस्कव्हरी स्पोर्ट्स आणि वेलार या गाड्यांमध्ये असलेलं इंटिरिअर आता इव्होक गाडीलाही मिळणार आहे. चालका शेजारीच नवीन वायरलेस चार्जिंग पॅडही असेल. (Land Rover Range Rover Evoque 2023)
Range Rover Evoque. Time to make a statement.
— Land Rover (@LandRover) April 12, 2023
(हेही वाचा – BJP MLA : समाजमाध्यमांवर सक्रिय व्हा, भाजप आमदारांना सूचना)
गाड्यांना आता इलेक्ट्रिट हायब्रिड पर्याय
ॲमेझॉन ॲलेक्सा व्हॉईस कंट्रोल, ॲपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटो या यंत्रणांना आता रेंज रोव्हर इव्होक सपोर्ट करते. शिवाय गाडीत आता नवीन हवा शुद्धीकरण यंत्रणाही बसवलेली आहे. रेंज रोव्हर इव्होकच्या डिझेल इंधनावर चालणाऱ्या एसयुव्ही सोडल्या तर इतर सर्व गाड्यांना आता इलेक्ट्रिट हायब्रिड पर्याय देण्यात आला आहे आणि वाढलेल्या बॅटरी क्षमतेमुळे त्यांची कामगिरीही वाढली आहे. संपूर्ण चार्ज केलेली बॅटरी ६८ किलोमीटरचा पल्ला गाठू शकते. आणि अर्ध्या तासात ही बॅटरी चार्ज होऊ शकते. (Land Rover Range Rover Evoque 2023)
भारतात नेमकी कधी ही गाडी लाँच होईल याची माहिती कंपनीने अजून दिलेली नाही. पण, गाडीची नवीन किंमत ७२ लाखांपासून सुरू होईल हे नक्की. (Land Rover Range Rover Evoque 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community