मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर कोसळली दरड! रेल्वे वाहतूक ठप्प

लोणावळा-खंडाळा व घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे घाट क्षेत्रात आठ ते दहा ठिकाणी डोंगरावरील दगड, माती व राडारोडा रेल्वे मार्गावर आल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबई – पुणे लोहमार्गावर मंकी हिल ते पळसदरी दरम्यान अनेक ठिकाणी लोहमार्गावर दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली. बुधवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ठाकूरवाडी ते कळमसरी दरम्यान ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच राडा रोडा हटविण्याचे काम रेल्वे कर्मचारी युद्धपातळीवर करीत आहे.

रुळाखालील खडी वाहून गेली!

लोणावळा-खंडाळा व घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे घाट क्षेत्रात आठ ते दहा ठिकाणी डोंगरावरील दगड, माती व राडारोडा रेल्वे मार्गावर आल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेली आहे, तर वार्‍यामुळे खांब वाकले आहे. वीज वाहिन्या तुटल्यामुळे वाहतूक खंडित झाली आहे. रेल्वे सेवा ठप्प झाल्याने रेल्वेने प्रवास करणार्‍या नागरिकांना जागोजागी अडकून पडावे लागले आहे. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रुळावरील राडारोडा बाजुला करण्याचे काम युद्ध पातळीवत सुरू असले तरी पावसामुळे पुन्हा माती खाली येत असल्याने पुढील काही काळ रेल्वे वाहतूक बंदच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(हेही वाचा : चिपळूणमध्ये २००५ची पुनरावृत्ती! ५ हजार जण अडकले!)

कसारा घाटातही कोसळली दरड! 

मुसळधार पावसाने घाटमाथ्यावर अक्षरशः कहर सुरु केला आहे. तीनच दिवसांपूर्वी कसारा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली होती, त्याची पुनरावृत्ती बुधवारी, २१ जुलै रोजी झाली. मध्यरात्री येथे पुन्हा रेल्वे मार्गावर दरड कोसळली, त्यामुळे मुंबईहून बाहेर गावी जाणाऱ्या बहुतांश लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरड कोसळल्याने ट्रॅकवर पडलेली माती काढण्याचे काम सुरु आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here