कोकणावर जल आपत्ती! आता महाडमध्ये दरड कोसळली! ३९ जणांचा मृत्यू

दरड कोसळलेल्या गावाला मदत करणे, बचावकार्य करणे, दरड उपसण्याचे काम करणे इत्यादी कामासाठी प्रशासनाने तातडीने मदत पथक पाठवले आहे.

168

कोकणात अतिवृष्टीमुळे संकटाची मालिका सुरूच असून आता महाडमध्ये दरड कोसळून ढिगाऱ्याखाली ३० घरे गेल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. येथील बिरवाडीपासून काही अंतरावर तळई गावात ही घटना घडली आहे. यात ७० हुन अधिक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. ३९ जणांचा मृत्यूदेह बाहेर काढण्यात आले.

(हेही वाचा: चिपळूणमध्ये २००५ची पुनरावृत्ती! ५ हजार जण अडकले!)

80 ते 90 जण ढिगा-याखाली

डोंगर कपारीत वसलेल्या महाड तालुक्यातील तळीये गावात गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही दरड कोसळल्याची माहिती मिळत आहे. संपूर्ण गावावर दरड कोसळल्याने तब्बल 35 ते 40 घरे त्याखाली दबली गेली आहेत. यात आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 80 ते 90 जण अजूनही ढिगा-याखाली सापडल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, NDRF कडून बचावकार्य सुरू आहे.

हा भाग डोंगराळ असल्याने मदत कार्यातही अनेक अडचणी येत आहेत. काही तासांपूर्वी NDRFची टीम दाखल झाल्यापासून इथे युद्धपातळीवर बचावकार्याला सुरुवात झाली आहे.

(हेही वाचाः गोवंडीत दुमजली घर कोसळले, ३ ठार! मुंबईत घरे पडण्याची मालिका सुरूच!)

बचाव कार्यासाठी येतायेत अडथळे!

सध्या महाडमध्येही अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे या भागातही पावसाचे पाणी साचल्यामुळे गावांचा संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे आता येथील  गावकऱ्यांना मदत करण्यासाठीही प्रशासनाला  आहे. त्यात आता दरड कोसळलेल्या गावाला मदत करणे, बचावकार्य करणे, दरड उपसण्याचे काम करणे इत्यादी कामासाठी प्रशासनाने तातडीने मदत पथक पाठवले आहे, मात्र तिथपर्यंत पोहचणे अवघड बनले आहे. रत्नागिरी, रायगड तसेच कोकणपट्ट्यात मुसळधार पाऊस आहे. येथे पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. चिपळूणसारख्या ठिकाणी तर घराघरात पाणी घुसले आहे. रस्त्यावर तब्बल १०-१० फूट पाणी साचले आहे. या पूरस्थितीमध्ये अनेक नागरिक त्यांच्या घरात अडकले आहेत. त्यांना रेस्क्यू करण्यासाठी बचावपथके तैनात करण्यात आली आहेत.

(हेही वाचाः महाडमध्ये हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचावकार्य)

रायगडमध्ये मुसळधार पाऊस

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे.  महाड आणि माणगाव तालुक्यात बुधवारी रात्रीपासून पाऊस बरसत असून आता पुन्हा पाऊस वाढला आहे. येथील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाड शहरात अजून पाणी भरलेले आहे. दरडी कोसळल्याने वरंधा घाट बंद करण्यात आला आहे. पाच ते सहा ठिकाणी दरडी कोसळल्याने अनेक प्रवाशी अडकले आहेत. त्यामुळे रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या परिसरात २४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.