Irshalgad Landslide : रायगडातील इर्शाळवाडीवर दरड कोसळून अनेक कुटुंब मलब्याखाली अडकली; मुख्यमंत्री शिंदे घटनास्थळी दाखल

मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर काल म्हणजेच बुधवार १९ जुलै रोजी रात्री उशिरा दरड कोसळली

303
Irshalgad Landslide : रायगडातील इर्शाळवाडीवर दरड कोसळून अनेक कुटुंब मलब्याखाली अडकले; मुख्यमंत्री शिंदे घटनास्थळी दाखल

गेल्या दोन – तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर (Heavy Rain) वाढला आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल ११ जिल्ह्यांना हवं खात्याने रेड अलर्ट दिला आहे. यामध्ये रायगड जिल्ह्याचा देखील समावेश आहे. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी (Irshalgad Landslide)  गावावर दरड कोसळल्याने खूप मोठी दुर्घटना घडली आहे.

रायगड जिल्ह्यातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर काल म्हणजेच बुधवार १९ जुलै रोजी रात्री उशिरा दरड (Irshalgad Landslide) कोसळली. ही दरड कोसळल्याने अनेक कुटुंब मलब्याखाली अडकले आहेत. रात्री मुसळधार पाऊस असल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत होता मात्र आता सकाळी उजाडल्यानंतर तिथल्या बचावकार्याला वेग आला आहे. घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन दाखल झाले आहेत.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : मुंबईसह ठाणे, कोकणातील सर्व शाळा गुरुवारी बंद, मुख्यमंत्र्यांची घोषणा)

अग्निशमन जवानाचा मृत्यू

दरड कोसळल्याची (Irshalgad Landslide) माहिती मिळताच बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखलझाली. दरम्यान, घटनास्थळी जात असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, घटनास्थळी पोहोण्यासाठी मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर असलेलं धुकं बाधा ठरतंय. तसेच पावसामुळे डोंगराचा रस्ता अत्यंत निसरडा झाल्यामुळं बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे.

बचावकार्यात अनेक अडथळे

अंधार आणि पावसामुळे (Irshalgad Landslide) तिथली माती निसरडी झाल्यानं वाडीपर्यंत पोहोचण्यास मदत पथकाला बचावकार्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळी उजेडात मदत आणि बचावकार्य जोमानं सुरु केलं असून सध्या २५ जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून ४ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर अजूनही १०० जण बेपत्ता आहेत.

रायगडातील इर्शाळवाडीवर (Irshalgad Landslide) ही अत्यंत दुर्गम भागातील वस्ती आहे. त्यामुळे तेथील बचावकार्यात अडचण येत आहे. या वाडीत एकूण ४० ते ४५ घरं होती. त्यातील १४ ते १५ घरं या दरडीखाली अडकले आहेत. या घटनेतील सर्व जखमींचा खर्च राज्य सरकार करणार असल्याची माहिती मिळत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.