राज्यातील मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आले आहेत तर काही ठिकाणी दरड (Landslide) कोसळली आहे. गेल्या दोन – तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. अशातच हवामान विभागाकडून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
या मुसळधार पावसामुळे आंबेनळी घाटात पुन्हा एकदा दरड (Landslide) कोसळली आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी (१८ जुलै) रात्री उशिरा या घाटात दरड कोसळली होती. त्यानंतर पुन्हा आज बुधवार १९ जुलै रोजी सकाळी याच घाटात दरड कोसळली.
पर्यटनच्या दृष्टीने हा आंबेनळी घाट अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर या घाटात अनेकदा दरड (Landslide) कोसळण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. हा घाट अलीकडेच वाहतुकीसाठी पूर्णपणे बंदही ठेवण्यात आला होता. त्यामुळे या घाटातून प्रवाशांनी, पर्यटकांनी वाहतूक करू नये यासाठी हा घाट पूर्णपणे सध्या बंद ठेवण्यात आला आहे.
Maharashtra: Due to landslide in Ambenali Ghat section between Poladpur (Raigad district) and Mahabaleshwar (Satara district), traffic movement on the route closed till further update. pic.twitter.com/46zyGdWh0h
— ANI (@ANI) August 5, 2019
(हेही वाचा – Heavy Rain : मुंबईसह राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस, ११ जिल्ह्यांना अलर्ट)
रायगड जिल्ह्यतील शाळांना सुट्टी
रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. सह्याद्री खोऱ्यात तसेच रायगड आणि रत्नागिरी येथे मुसळधार पाऊस सुरू आहे. महाड पोलादपूर रस्ताही पाण्याखाली गेला आहे. त्यानंतर रायगड जिल्हा प्रशासनाकडून नियंत्रित पद्धतीने हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा मोठी दरड कोसळल्याने (Landslide) घाटाच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तसेच जिल्ह्यतील सर्व शाळांना अतिमुसळधार पावसामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
संपूर्ण तीन महिने घाट बंद ठेवण्याची मागणी
आंबेनळी हा घाट (Landslide) पावसाळ्यात वाहतुकीसाठी पूर्णपणे तीन महिने बंद ठेवावा, अशा मागणी महाड प्रशासनाने रायगड जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. जिल्हा प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community