नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई – गोवा महामार्गावर (Landslide) दरड कोसळल्याने तिथली वाहतूक ठप्प झाली. आज म्हणजेच गुरुवार २७ जुलै रोजी सकाळी ८ वाजता निवळी घाटामध्ये ही दरड कोसळली. रस्त्यावरील दरड हटवण्याचे सध्या प्रयत्न सुरु आहेत. साधारण दोन तासांनंतर मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरु झाली आहे.
(हेही वाचा – Heavy Rain : मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ‘रेड अलर्ट’)
गेल्या दोन – तीन दिवसांपासून रत्नागिरी (Landslide) जिल्ह्यांत पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज (Heavy Rain) मुंबईसह, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यालाही हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. रायगड जिल्ह्याला उद्याही रेड अलर्ट देण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community