व्हेल माशाच्या उलटीची मुंबई, ठाण्यात मोठ्या प्रमाणात तस्करी!

४ किलो १०० ग्राम वजनाची व्हेल माशाची उलटी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्याची किंमत चार कोटी ३० हजार रुपये आहे.

औषधे, मद्य, सुंगधी द्रव्य आणि सौदर्य प्रसाधने यासाठी वापरण्यात येणारी व्हेल माशाची उलटीची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईत दोन ठिकाणी केलेल्या कारवाईनंतर ठाणे गुन्हे शाखेने देखील एका टोळीला व्हेल माश्याच्या उलटीसह अटक केली आहे. या टोळ्यांकडून जप्त करण्यात आलेल्या व्हेल माश्याच्या उलटीची किंमत कोट्यवधींच्या घरात असून तिच्या विक्री व खरेदीवर बंदी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जप्त केलेल्या उलटीची किंमत ४ कोटी ३० हजार रुपये

ठाणे पोलिसांच्या वागळे इस्टेट गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठाण्यातील घोडबंदर रोड येथे व्हेल माश्याची उलटी विक्रीसाठी आलेल्या दोघांना शुक्रवारी अटक केली. या दोघांजवळून ४ किलो १०० ग्राम वजनाची व्हेल माशाची उलटी ताब्यात घेतली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या उलटीची किंमत चार कोटी ३० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गेल्या महिन्यात मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ७ आणि ४ च्या पथकाने मुलुंड येथून दोन टोळ्यांना व्हेल माश्याच्या उलटीसह अटक केली होती.

(हेही वाचा : बकरी ईद दिनी प्रतिकात्मक कुर्बानी द्या! राज्य सरकारची मार्गदर्शक तत्वे)

व्हेल माशाची उलटी कशी असते?

आंबेरग्रीस खोल समुद्रात राहणारा व्हेल मासा हा दुर्मिळ असून खूप कमी प्रमाणात आढळून येतो, त्याच प्रमाणे त्याच्या पोटात तयार होणारे स्पर्म देखील दुर्मिळ आहे. हे स्पर्म व्हेल मासा समुद्राच्या आत आपल्या तोंडावाटे उलटी करून बाहेर काढतो, हे स्पर्म समुद्राच्या पाण्यावर तवंग तयार होऊन दगडा सारखा होतो. त्याला आंबेरग्रीस असे म्हणतात. हे आंबेरग्रीस सुगंधी प्रसाधने, अत्तर, सिगारेट, मद्य, खाद्यपदार्थ आणि औषधे यांच्यात वापरतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here