पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) पाण्याची मोठी टाकी कोसळली आहे. टाकीच्या ढिगार्याखाली अनेक जण अडकले आहेत. भोसरीच्या सद्गुरू नगरमध्ये ही घटना गुरूवार, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली आहे. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी तत्काळ बचावकार्य करत जखमींना तातडीने उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केले आहे. यामध्ये 3 बिगारी कामगारांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – Bmc ने हाती घेतले अव्वाच्या सव्वा प्रकल्प; खर्च भागवण्यासाठी आता कर्ज उभारण्याची आली वेळ)
घटनास्थळी बचावकार्य, अँब्युलन्स तसेच अग्निशमन दलाचे जवान, बचाव पथकाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी मोठी गर्दी जमली आहे. भोसरीच्या सद्गुरू नगरमध्ये तात्पुरत्या स्वरूपाची सोय म्हणून बांधलेली पाण्याची टाकी अचानक कोसळली, या दुर्घटनेत 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे कामगार लेबर कॅम्पमध्ये वास्तव्यास होते. आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असून, बचाव कार्य सुरू आहे. प्रशासनाकडून या घटनेचा तपास सुरू असून, दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
पाण्याच्या टाकीच्या कोसळण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, परंतु या घटनेमुळे बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली असून संबंधित कंत्राटदारावर कारवाई होण्याची शक्यता आहे. (Pimpri Chinchwad)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community