प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार (Pew Research Center reports), २०५० पर्यंत भारत हा जगातील सर्वात मोठी हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्या (2050 Hindu and Muslim population) असलेला देश बनेल. सध्या भारत हिंदू धर्माचा सर्वात मोठा केंद्रबिंदू आहे; मात्र येत्या काही दशकांत येथे मुस्लिम लोकसंख्याही वेगाने वाढेल, असे या अहवालात म्हटले आहे. (Largest Population )
भारताची सांस्कृतिक विविधता कायम राहील भारत धार्मिक विविधतेचा देश राहील आणि सर्व धर्मामधील नागरिक शांततेत एकत्र राहतील. यामुळे भारतीय संस्कृती अधिक मजबूत आणि एकसंध राहील, असे या अहवालात म्हटले आहे. २०५० पर्यंत भारत जगातील सर्वाधिक हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनेलः पण धार्मिक सहिष्णुता आणि विविधता कायम राहील.
(हेही वाचा – RSS headquarters : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाची रेकी करणाऱ्या दहशतवादी रईस शेखचा जामीन अर्ज फेटाळला)
सध्या इंडोनेशियामध्ये सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या
भारतातील मुस्लिम लोकसंख्या २०५० (Muslim population 2050) पर्यंत २११ दशलक्षपर्यंत (३१.१ कोटी) पोहोचण्याची शक्यता आहे, जी जागतिक मुस्लिम लोकसंख्येच्या सुमारे ११ टक्के असेल. यामुळे भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनेल. सध्या इंडोनेशियामध्ये सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या आहे; मात्र २०५० पर्यंत भारत या स्थानावर पोहोचेल.
मुस्लिम लोकसंख्या वाढण्याचे मुख्य कारण काय ?
भारतात मुसलमानांची वाढ हिंदूंच्या तुलनेत जलद होण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मुस्लिम धर्मात कमी क्यात लग्न करण्याची प्रथा आहे. त्यामुळे त्या धर्मात प्रजनन दराचे प्रमाण अधिक आहे.
ख्रिश्चन धर्माची स्थिती काय?
भारतामध्ये विविध धार्मिक अल्पसंख्याकदेखील आहेत. २०१० मध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येच्या २.५ टक्के ख्रिश्चन (Christian population) होते; मात्र, २०५० पर्यंत ही संख्या २.२ टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज आहे.
(हेही वाचा – IPL 2025 : आयपीएलच्या नवीन हंगामात बदललेले आणि कायम राहिलेले सर्व नियम एका दृष्टीक्षेपात)
२०१० मध्ये १८.४ टक्के मुस्लिम लोकसंख्या होती
याच कारणांमुळे २०१० मध्ये १४.४% असलेली मुस्लिम लोकसंख्या २०५० पर्यंत १८.४% होण्याचा अंदाज आहे. मात्र, हिंदू लोकसंख्या ७६.७% असल्याने भारत हिंदूबहुल देश राहील. तसेच २०१० मध्ये जागतिक हिंदू लोकसंख्येच्या ९४ टक्के हिस्सा भारतात होता आणि २०५० पर्यंतही ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार, २०५० पर्यंत भारतात १.३ अब्ज हिंदू असतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community