माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची शनिवारी, 12 ऑक्टोबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान 13 ऑक्टोबर रोजी त्यांचा शासकीय इतमामात दफनविधी करण्यात आला. बडा कब्रस्तान येथे हा दफनविधी करण्यात आला. काही वेळापूर्वी त्यांच्या घराबाहेरून अंत्ययात्रेला सुरुवात झाली होती. घराबाहेर हजारो लोकांकडून ‘नमाज ए जनाना’प्रार्थना करण्यात आली. यावेळी आमदार झिशान सिद्दिकी यांनी वडिलांना निरोप देताना टाफो फोडला.
दिग्गज नेते, बॉलिवूड सेलिब्रिटींची उपस्थिती
बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी, दिग्गज नेत्यांसह सर्वसामान्य लोकांची रिघ लागलेली पाहायला मिळाली. सिद्दिकी यांच्या वांद्रे येथील घराबाहेर फार मोठी गर्दी देखील पाहायला मिळाली होती.
सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून दोन आरोपींना अटक
बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून आत्तापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, शनिवारी अटकेची कारवाई केल्यानंतर पोलिसांनी दोघांना रविवारी न्यायालयात हजर केले होते. त्यातील एका आरोपीला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर एका आरोपीच्या वयाबाबतच्या टेस्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका आरोपीचे वय 17 असल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला होता. वकीलांच्या युक्तीवाद गांभिर्याने घेत न्यायाधीशांना त्याच्या वयासाठी आवश्यक टेस्ट घेण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय वय उघड करण्यासाठी घेण्यात आलेल्या चाचण्यानंतर त्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community