लता दीदींच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी पहाटेपासून शिवाजी पार्कात वर्दळ सुरूच… 

171

भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पार्थिव देहावर रविवारी, ६ फेब्रुवारी रोजी शिवाजी पार्क येथे मंत्राग्नि देण्यात आला. अति महत्वाच्या व्यक्तींच्या गर्दीमुळे चाहत्यांना लता दीदींचे दर्शन घेता आले नाही. लांबून दर्शन घेणाऱ्या या स्वर सरस्वतीचे दर्शन घेण्यासाठी सोमवारी, ७ फेब्रुवारी पहाटेपासूनच चाहत्यांचे पाय शिवाजी पार्ककडे वळत होते आणि चितेकडे पाहून हात जोडून नमस्कार करत होते.

कर जोडून करती नमस्कार… 

लता दीदींच्या पार्थिव देहावर रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी हजारो चाहते वर्ग शिवाजी पार्कात जमला होता. पेडर रोड ते शिवाजी पार्क लष्कराच्या ट्रॅक फुलांनी सजवून पार्थिव शिवाजी पार्कात आणण्यात आले होते. लता दीदींचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी अग्नी दिला आणि सगळ्या चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आले. सोमवारी पहाटेपासून शिवाजी पार्कात चाहत्यांची दर्शनासाठी वर्दळ सुरूच होती. यात मॉर्निंग वॉकसाठी येणारेही आवर्जून चितेकडे येऊन हात जोडून दर्शन घेताना दिसत होते.

(हेही वाचा शाहरूख खान लता ताईंच्या पार्थिव देहावर थुंकला? सोशल मीडियावर झाला ट्रोल)

आदिनाथ मंगेशकर अस्थी नेणार 

दरम्यान हृदयनाथ मंगेशकर यांचे चिरंजीव आदिनाथ मंगेशकर हे सकाळी १०.३० वाजता शिवाजी पार्क येथे येऊन अस्थी घेऊन प्रभूकुंज येथे घेऊन जाणार आहेत. त्याप्रमाणे तसे नियोजन करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.