Lata Mangeshkar Puraskar 2024 : गायिका अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

177
Lata Mangeshkar Puraskar 2024 : गायिका अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कार जाहीर झाले असून, यावर्षीचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार (Lata Mangeshkar Puraskar 2024) ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी (१३ ऑगस्ट) पत्रकारांशी बोलताना या पुरस्कारांसहीत अन्य विविध पुरस्कारांचीही यावेळी घोषणा केली.

अन्य जाहीर केलेल्या पुरस्कारात नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कारांसह अन्य बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा मुनगंटीवार यांनी केली. यावेळी त्यांनी सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदनही केले.

(हेही वाचा – Solar Energy : रेफ्युजी १ आणि २ गावांतील सौर ऊर्जा प्रकल्प मेजर कौस्तुभ यांना समर्पित)

पुरस्काराचे स्वरुप बदलले

संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार (Lata Mangeshkar Puraskar 2024) जाहीर झालेला आहे. शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पण केले आणि शास्त्रीय संगीत क्षेत्राची सेवा केली, त्या कलाकारांच्या योगदानाबद्दल दिला जाणारा सन २०२४ च्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आरती अंकलीकर-टिकेकर यांना जाहीर झाल्याचेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत गेल्या वर्षीपासून दुप्पट वाढ करण्यात आली असून, पूर्वी या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम पाच लाखावरून १० लाख रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे करण्यात आले असून राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची रक्कम तिप्पट करण्यात आली आहे. पूर्वी या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र होते, ते आता तीन लाख रोख, मानपत्र व मानचिन्ह असे करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

(हेही वाचा – Ajit Pawar : लोकसभेवेळी ‘ती’ चूक करायला नको होती; अजित दादांच्या मनाला लागली ‘ती’ गोष्ट)

यावेळी मुनगंटीवार यांनी सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन करत या विजेत्यांकडून अजून मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक क्षेत्राची सेवा होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली. त्याचवेळी राज्यातील कलाकारांना विविध माध्यमातून प्रोत्साहन मिळण्याबाबत, सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच प्रयत्नशील राहत असून, भविष्यातही कलाकारांसाठीच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक क्षेत्र अधिकाधिक संपन्न व्हावे यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सदैव तत्पर असल्याची ग्वाहीही मुनगंटीवार यांनी दिली. (Lata Mangeshkar Puraskar 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.