लता दीदींवर होता वीर सावरकरांचा प्रभाव! कोणत्या शब्दांत व्यक्त केलेले सावरकर प्रेम?

183

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे व्यक्तीमत्व बहुगुण संपन्न होते. स्वरांची आराधना करणाऱ्या लता दीदींमध्ये देशभक्ती, राष्ट्रप्रेम होते. स्वातंत्र्यासाठी संपूर्ण आयुष्याचा यज्ञ केलेले वीर सावरकर यांचा लता दीदींवर प्रभाव होता. वेळोवेळी त्यांनी ते जाहीरपणे व्यक्त केले होते. वीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांचा लता दीदींनी कणखरपणे समाचार घेत असत.

मुख्यमंत्री बघेल यांना सुनावले होते 

२०१९ साली छत्तीसगडच्या मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी वीर सावरकर यांच्यावर अवमानकारक वक्तव्य केले होते. वीर सावरकर यांनी दोन राष्ट्राची संकल्पना आणण्याचा विचार मांडला होता. त्यानंतर मोहम्मद जिना यांनी ती संकल्पना स्वीकारली, असे विधान भूपेश बघेल यांनी केले होते. त्यावेळी लता दीदी यांनी, ‘जे लोक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात बोलत आहेत, त्यांना वीर सावरकर यांच्या देशभक्तीबद्दल आणि स्वाभिमानबद्दल माहित नाही, असे रोखठोक ट्विट केले होते. ‘नमस्कार, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या व्यक्तित्त्वाला आणि देशभक्तीला प्रणाम करते. आज काल काही लोक सावरकरांच्या विरोधात वक्तव्य करत आहेत, पण त्यांना हे माहीत नाही की सावरकरजी किती मोठे देशभक्त आणि स्वाभिमानी होते,’ असे लता दीदींनी ट्विटमध्ये म्हटले होते. भूपेश बघेल यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात त्याची फार चर्चा झाली होती.

वीर सावरकर यांच्याशी मंगेशकर कुटुंबाचे होते घनिष्ट संबंध 

एका मुलाखतीत लता दीदी यांनी त्यांचे वडील पं. दीनानाथ मंगेशकर यांच्यावरही वीर सावरकर यांच्या प्रभाव होता. बाबांची वीर सावरकर यांच्यावर भक्ती होती. बाबा जेव्हा सांगलीला होते तेव्हा तात्या (वीर सावरकर) हे नेहमी तिथे भेटायला यायचे. त्यांच्यासोबत अनेकदा सहभोजन करायचे, असे त्या म्हणाल्या होत्या. वीर सावरकर आणि मंगेशकर कुटुंब यांचे घनिष्ट संबंध होते. त्यामुळे वीर सावरकर यांनी आपल्या वडिलांसाठी ‘संन्यस्थ खड्ग’ नाटक लिहिले होते. या नाटकाचा पहिला प्रयोग १८ सप्टेंबर १९३१ रोजी झाला होता. जे लोकप्रिय झाले होते, अशी आठवणही लता दीदींनी ट्विटद्वारे करून दिली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.