आरोग्य विभागाच्या परीक्षेचा सावळा गोंधळ थांबेना

अनेक विद्यार्थ्यांना पेपर मिळण्यास उशीर झाल्याचे समोर आले. तसेच मुलांच्या आसनव्यवस्थेही घोळ झाला आहे.

आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ सुरूच असून, आज मुंबई, पुणे, नाशिक येथील आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झाल्याचे समोर आले आहे.

अनेक विद्यार्थ्यांना पेपर मिळण्यास उशीर झाल्याचे समोर आले. तसेच मुलांच्या आसनव्यवस्थेही घोळ झाला आहे. पुण्यात एका केंद्रावर परीक्षेची वेळ होऊनही विद्यार्थांना आसन क्रमांक न मिळाल्याचा आरोप करत विद्यार्थांनी गोंधळ घातला आहे.

परीक्षा केंद्रांवर सर्व अधिकारी उडवा-उडवीची उत्तर देत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. नाशिकमध्ये निम्म्या विद्यार्थांना पेपरच मिळालेच नाही.

आरोग्य मंत्री काय म्हणालेत

या झालेल्या प्रकरणावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले असून, पुण्यात दिलेल्या डिजीटल प्रश्नपत्रिकेच्या लॉकला तांत्रिक अडचण आल्यानं थोडा उशीर झाला, ही वेळ विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात येईल, असे टोपे यांनी सांगितले.

परीक्षेसाठी केवळ ५ ते १० मिनिटं उशीर झाल्याची माहिती मला मिळाली आहे. त्यानुसार, तेवढा वेळ विद्यार्थांना वाढवून देण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here