Latur Earthquakes : लातूर जिल्ह्यात तीन दिवसांत चार भूकंपाचे धक्के जाणवले; गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

101
Latur Earthquakes : लातूर जिल्ह्यात तीन दिवसांत चार भूकंपाचे धक्के जाणवले; गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

गेल्या काही दिवसांपासून देशात भूकंप (Latur Earthquakes) होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच लातूरमध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये चारवेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे सगळया गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

अधिक माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील (Latur Earthquakes) हासोरीसह उस्तुरी भागात गेल्या तीन दिवसांमध्ये चार भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. बुधवारी (४ ऑक्टोबर) रोजी रात्री आठ वाजून ५७ मिनिटांनी म्हणजेच ९ वाजेच्या सुमारास पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची रिश्टर स्केलवर १.६ इतकी नोंद झाली आहे.

(हेही वाचा – Monsoon Update : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ तर, देशात थंडीची चाहूल)

मागील वर्षात ९ भूकंपाचे धक्के

विशेष म्हणजे गेल्यावर्षी याच काळात याच जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे (Latur Earthquakes) एकूण नऊ धक्के जाणवले होते. यावर्षी २ ऑक्टोबरला तीन धक्के जाणवले होते. त्यानंतर बुधवारी रात्री आठ वाजून ४९ मिनिटाला एक आणि आठ वाजून ५७ मिनिटाला एक असे दोन धक्के जाणवले. परंतु, प्रशासनाकडून एकच धक्का जाणवल्याचे सांगितले जात आहे.

नागरिक संतप्त

प्रशासनाला वेळोवेळी याची माहिती गावकरी (Latur Earthquakes) आणि सरपंच देत आहेत. मात्र, प्रशासकीय पातळीवर नागरिकांच्या जीवितासाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. यामुळे, हासुरी आणि आजूबाजूच्या गावातील नागरिक संतप्त झाले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.