लातूर येथील औसा रोडवरील शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनींनी रात्री जेवणात चपाती आणि भेंडीची भाजी खाल्ल्यानंतर त्यांना मळमळ आणि उलटीचा त्रास (Food Poisoning) सुरू झाला होता. याची माहिती मिळताच घटनास्थळी रुग्णवाहिका आणि पोलीस अधिकारी दाखल झाले होते. ज्या विद्यार्थिनींना अधिकचा त्रास होत होता, त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे हलवण्यात आलं असून अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांच्या उपस्थितीत उपचार सुरू आहेत.
रात्रीच्या जेवणातून विषबाधा
औसा रोडवरील मुलींच्या वसतीगृह क्रमांक २ मधील विद्यार्थिनींना रात्रीच्या जेवणातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याने अनेक मुलींची तब्येत बिघडली. रात्री मुलींना उलटी, मळमळ असा त्रास होऊ लागला. मात्र यात कोणाचीही प्रकृती चिंताजनक नसल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री ११ वाजता अचानक मुलींना उलटीचा त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांना लातूरमधील विलासराव देशमुख सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे मुलींना तपासल्यानंतर डॉक्टरांनी फूड पॉयझनिंग झाल्याची माहिती दिली. (Food Poisoning)
जेवणात सरडा?
हॉस्टेलमधील जेवणाचा एका फोटो, व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये जेवणात सरडा असल्याचं सांगितलं जात आहे. जेवणात सरडा मिळाल्याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. जेवणात सरडा मिळाल्यामुळेच विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामुळे मुलींना उलटी, चक्कर, जुबाल याचा त्रास सुरू झाला, त्यानंतर मुलींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. (Food Poisoning)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community