महिलांना मोफत बस सुविधा देणारी ‘ही’ आहे देशातील पहिली महापालिका!

173

लातूर महानगरपालिका महिलांसाठी मोफत बस सुविधा पुरविणारी देशातली पहिली महानगरपालिका ठरली असून महिलांना सुरक्षित सेवा देणारी ही योजना अत्यंत यशस्वी होईल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले. लातूर महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्या वतीने या सेवेचा शुभारंभ शिवाजी चौकात त्यांच्या हस्ते झाला. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना स्मार्ट कार्ड देण्यात येईल. या बसमध्ये एक कर्मचारी महिला असेल तसेच या बससाठी काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरीफिकेशन होईल असे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

( हेही वाचा : मादी बिबट्यानं माणसावर केला हल्ला आणि… )

पर्यावरण पूरक बस

या बसेसमध्ये एक बस सीएनजीवर, एक बस इथेनॉलवर आणि एक बस इलेक्ट्रिकल असावी असा प्रयत्न महानगरपालिकेकडून करावा जेणे करून या बस पूर्णपणे पर्यावरण पूरक होतील. वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी असे प्रयोग करावे लागतील. शहरातील सर्व ऑटो सीएनजी वर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आता साखर कारखान्यातील ट्रॅक्टरही सीएनजी वर चालवणार आहेत. खासगी बससाठी खासगी तत्वावर टर्मिनल उभं करणार असून शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी काही प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सुरक्षित प्रवास

यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूर शहरासाठीच्या योजनांचा आढावा घेतला. महिलांसाठी मोफत बससेवेबाबत महापालिका आयुक्त अमन मितल यांनी माहिती दिली. यातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे

  • महिलांना स्मार्ट कार्ड दिले जाणार
  • सुरक्षित प्रवास, बस मध्ये असेल एक महिला कर्मचारी
  •  महानगरपालिका हद्दीत सेवा पुरविली जाईल
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.