Latur महापालिका आयुक्तांनी स्वत:वर झाडली गोळी; डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू

125

लातूर (Latur) महापालिकेचे आयुक्त (Municipal Commissioner) बाबासाहेब मनोहरे (Babasaheb Manohare) यांनी शनिवार, ५ एप्रिल रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. ही घटना लातूर शहरातील बार्शी रोडजवळील शासकीय निवासस्थानी घडली. त्या वेळी सुरक्षारक्षकांसह परिवारातील सदस्यांनी मनोहरे यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, व्हेंटिलेटवर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आयुक्त मनोहरे यांनी २० ऑक्टोबर २०२२ रोजी लातूर महापालिकेत पदभार स्विकारला होता. आयुक्त आणि प्रशासक असल्याने संपूर्ण कारभार तेच पाहत होते. नुकताच २७ मार्च रोजी त्यांनी मनपाचा अर्थसंकल्प सादर केला. शनिवारी सुटी असल्याने ते घरीच होते.

(हेही वाचा – Ration Card : तुमचे रेशन कार्ड रद्द होणार ! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर …)

मनपा आयुक्त मनोहरे यांच्या शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा नेमके काय घडले, त्यांनी डोक्यात गोळी झाडून का घेतली, याचा पोलीस तपास करीत आहेत. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी स्वतःच डोक्यात गोळी झाडल्याचे दिसून येत आहे, असे पोलिस म्हणाले. डोक्यात गोळी झाडली होती, त्यावेळी त्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. आवाज आल्यानंतर सुरक्षा रक्षक आणि कुटुंबियांनी दरवाजा तोडून त्यांना रूग्णालयात आणले. हा प्रकार घडला त्यावेळी निवासस्थानी पत्नी आणि दोन्ही लहान मुले होती.

मनोहरे यांना तातडीने सह्याद्री रूग्णालयात (Sahyadri Hospital) दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असून, ते व्हेंटिलेटरवर आहेत. उपचार करणारे न्यूरोसर्जन डॉ. हणमंत किनीकर म्हणाले, उजव्या कानशिलाच्या बाजूने गोळी आत जावून डावीकडे वरच्या बाजूने गेली आहे. प्रकृती गंभीर असली तरी त्यांच्या मोठ्या रक्तवाहिनीला दुखापत नाही. त्या रक्तवाहिनीच्या जवळून गोळी गेली आहे. प्रयत्न सुरू आहेत. प्रकृतीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे, असेही डॉ. किनीकर म्हणाले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजी मंत्री आ. अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी जिल्हाधिकारी डॉ. वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याशी संपर्क साधून आयुक्तांच्या प्रकृतीची विचारपूस करून घटनेची माहिती घेतली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.