पुण्यातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या पुण्यातील लाल महालात विनापरवाना लावणी नृत्याचं चित्रीकरण केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवी पाटील या तरुणीसह तिघांविरुद्ध फरासखाना पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाल महालात अशाप्रकारे लावणी नृत्य केल्याप्रकरणी अखिल भारतीय मराठा महासंघाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या
वैष्णवी पाटील या तरुणीने पुण्यातील लाल महालात विनापरवाना लावणी नृत्याचं चित्रीकरण करण्यात आलं. त्यामुळे संभाजी ब्रिगेड संघटनेकडून वैष्णवी पाटीलसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अखिल भारतीय मराठा महासंघाकडून आता लाल महालाचं शुद्धीकरण करण्यात येत आहे. शौर्याची पवित्र जागा अपवित्र केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मासाहेबांनी शिवरायांना जिथे महिलांचा आदर करायला शिकवलं, त्याच लाल महालात लावणी नृत्य सादर करण्यात आलं. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या असून नृत्य किंवा लावणी करण्याचं हे ठिकाण नाही. त्यामुळे याबाबत कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासांघाकडून करण्यात येणार आहे.
(हेही वाचाः शरद पवार ब्राह्मणविरोधी! पवारांचे ब्राह्मण संघटनांना चर्चेचे निमंत्रण, पण…)
वैष्णवीने मागितली माफी
यानंतर आता नृत्यांगना वैष्णवी पाटील हिने फेसबूक लाईव्ह करत केलेल्या कृत्याची माफी मागितली आहे. हा व्हिडिओ करताना माझ्या मनात शिवप्रेमींचा मन दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. पण ही माझी चूक असल्याचे म्हणत तिने आपला माफीनामा दिला आहे.
Join Our WhatsApp Community