जबरदस्तीच्या धर्मांतराविरोधात अजूनही संघर्ष करतायत अनेक ‘लावण्या’

115

19 जानेवारी 2022 रोजी तमिळनाडू येथे एका 17 वर्षीय मुलीने जबरदस्तीने धर्मांतरणाला वैतागून नैराश्यग्रस्तेत आत्महत्या केली. कॉन्व्हेंट शाळा वा इंग्रजी होस्टेलमध्ये शिकवणीच्या आड होत असलेल्या, खऱ्या चेहऱ्यांचे वास्तव म्हणजे जबरदस्तीने ख्रिस्ती धर्मांतरणाचा खेळ हे आहे. ख्रिश्चन संस्थांमध्ये शिकणा-या इतर धर्माच्या मुलांना धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जात आहे. लावण्या ही एकटीच या धर्मांतरणाविरोधात संघर्ष करत होती असे नाही, तर अशा अनेक घटना घडल्या आहेत.

….तर हिंदू मुलांचा छळ होतो

शिक्षणाच्या नावाखाली,  सरकारी अनुदानित ख्रिश्चन मिशनरी शाळा कशा प्रकारे धर्मांतर करत आहेत, याची अनेक प्रकरणे उघड झाली आहे. ख्रिश्चन मिशनरीमध्ये शिकण्यासाठी गरीब मुलांना फी माफीचे आमिष दाखवून, धर्मांतर करण्यास भाग पाडले जाते. गरीब मुलांचे ब्रेन वाॅश करुन त्यांना ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यास सांगितले जाते. तसेच जी मुले याला विरोध करतात, त्यांना जुमानत नाहीत, त्यांना त्रास दिला जातो. अशा प्रकारे हिंदू विद्यार्थ्यांना धर्मांतरणाच्या छळाला तोंड द्यावे लागत आहे.

१२ वीमध्ये शिकणा-या हिंदू विद्यार्थीनीवर अत्याचार

तमिळनाडूमधील सरकार अनुदानित ख्रिश्चन शाळेतील मुख्याध्यापकाने 12 वीच्या विद्यार्थीनींचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आला होता. सुट्ट्यांमध्ये विशेष वर्ग आयोजित करण्याच्या बहाण्याने विद्यार्थीनींचे नंबर मिळवून, त्यांना अश्लील संदेश आणि फोटो पाठवत होता. तसेच, एका ख्रिश्चन मिशनरी शाळेने अयप्पा स्वामींची दीक्षा घेतल्यामुळे एका विद्यार्थीनीला शिक्षा केली. या हिंदू विद्यार्थीनीला शिक्षा केल्याबद्दल, सेंट मेरी स्कूलच्या विरोधात कायदेशीर हक्क संघटना एलआरपीएफने तक्रार दाखल केली. तमिळनाडूमध्ये एका 65 वर्षीय ख्रिश्चन गृह संस्थापकाने अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केला. या छळापासून वाचण्यासाठी अल्पवयीन मुलीने आश्रमातून पळ काढला. पाॅस्को कायद्याअंतर्गत या आरोपीस दोषी ठरवून, न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.

११ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ 

चेन्नई पोलिसांनी पेरुगुडी येथील मॉन्टफोर्ट शाळेचे मुख्याध्यापक जी जयापॉल यांना 11 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक केली आहे. सुमारे दोन महिने मुलीने शाळेत जाण्यास नकार दिल्याने, हा प्रकार उघडकीस आला. मुलगी शाळेत दीर्घकाळ गैरहजर राहिल्याने, तिच्या पालकांनी चौकशी केली असता हा प्रकार उघड झाला. त्यानंतर त्याच शाळेतील दुस-या विद्यार्थीनीच्या पालकांनी असा आरोप केला की, या मुख्याध्यापकाच्या लैंगिक छळामुळे त्यांच्या मुलीने 6 महिन्यांपूर्वी आत्महत्या केली.

( हेही वाचा :आता व्हिडिओ गेमसारखी गाडी चालवून मिळवता येणार वाहन परवाना )

धर्मांतराच्या रॅकेटचा पर्दाफाश

असाच एक प्रकार मध्य प्रदेशात उघडकीस आला. मध्य प्रदेशात रायसन येथील ख्रिश्चन मिशनरी मुलींच्या वसतीगृहात धर्मांतराचे रॅकेट सुरु होते. त्याचा पर्दाफाश करण्यात आला. या वसतीगृहात आदिवासी हिंदू मुलींना वसतीगृहात आणले जात होते आणि त्यांना ख्रिश्चन धर्म स्विकारायला भाग पाडले जात होते. तसेच या मुलींना ख्रिश्चन धार्मिक पुस्तकांच वाचन शिकवलं जात होतं.

१९ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

तमिळनाडूमधील एका ख्रिश्चन शाळेतील क्रीडा प्रशिक्षकाने लैंगिक छळाच्या तक्रारींची नोंद करण्यात आली होती. नागराजन सेंट जोसेफ स्पोर्ट्स अकादमीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात, ज्याला प्राइम स्पोर्ट्स अकादमी म्हणूनही ओळखले जाते, जो सेंट जोसेफ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचा एक भाग आहे. एका 19 वर्षांच्या मुलीने अल्पवयीन असताना तिचा तिच्या सहकारी प्रशिक्षकाकडून लैंगिक छळ केला गेल्याची तक्रार केल्यानंतर, नागराजनला अटक करण्यात आली.

१५ वर्षीय विद्यार्थ्याचा अमानुष छळ 

ख्रिश्चन धर्मांतराला विरोध केल्यामुळे, वसतिगृहाच्या वॉर्डनने 15 वर्षीय विद्यार्थ्याचा अमानुष छळ केल्याने त्याचा मृत्यू झाला. त्रिपुरा येथील पबियाछरा येथील होली क्रॉस शाळेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याचा वसतिगृहाच्या वॉर्डनकडून वारंवार छळ केल्यामुळे, गेल्या आठवड्यात जीबीपी रुग्णालयात मृत्यू झाला. हॅप्पी देबबरमा असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

शिक्षणाऐवजी शिकवले जाते बायबल  

आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत धार्मिक प्रवृत्ती आणि शैक्षणिक नियमांचे उल्लंघन केल्याची धक्कादायक घटना समोर आली. सरकार रामचंद्रपुरम गाव, कडपा जी.एपी येथील शाळेतील शिक्षक मुलांना विषयांऐवजी बायबलचे पठण करायला लावतात आणि ‘केवळ बायबल त्यांना विषय नव्हे तर येशूला प्रिय बनवेल’ असे सांगून आपल्या कृतीचे समर्थन करतात,’ असे तेलुगू भाषेतील भारत टुडे या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.

(हेही वाचा जिना टॉवरचा बदलला रंग, आता नाव बदलण्याचीही मागणी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.