अमेरिकेत (America) हिंदूंविरुद्ध (Hindu) द्वेष पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कायदा लागू करण्यात येणार आहे. अमेरिकेतील जॉर्जिया (Georgia) राज्यात ‘हिंदूफोबिया’ विरोधात एक विधेयक मांडण्यात आले आहे. असे विधेयक मांडणारे जॉर्जिया हे पहिले राज्य आहे. कायदा मंजूर झाल्यानंतर, हिंदूंविरुद्ध (Hindu) द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. हिंदूफोबियाविरुद्ध लढण्यासाठी जॉर्जिया प्रांतीय सिनेटमध्ये एक विधेयक सादर करण्यात आले आहे. त्याचे सध्याचे नाव SB375 असे आहे. दि. ४ एप्रिल २०२५ रोजी जॉर्जिया प्रांतीय सिनेटमध्ये हे विधेयक सादर करण्यात आले. यावर सध्या वादविवाद सुरू आहे. त्यात या कायद्याला सिनेटमधील डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन (Republican Party) सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. (America)
( हेही वाचा : Dead Body : शवागृहातील ७५ बेवारस मृत आत्म्यांना मिळणार मुक्ती; कशी वाचा)
डेमोक्रॅट्स जेसन एस्टेव्हज, इमॅन्युएल जोन्स , रिपब्लिकन शॉन स्टिल आणि क्लिंट डिक्सन यांनी या कायद्याला पाठिंबा दर्शवला आहे. हा कायदा या सिनेटरनी आणला आहे. “गेल्या काही वर्षांत, देशभरात हिंदूंविरुद्धच्या (Hindu) गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे,” असे सिनेटर स्टील म्हणाले. हा प्रस्ताव अद्याप सिनेटने मंजूर केलेला नाही. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर जॉर्जियामधील स्थानिक कायदा बदलला जाईल. यानंतर, हिंदूंविरोधात (Hindu) द्वेषपूर्ण बोलणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल. तसेच त्यांच्या शिक्षेशी संबंधित आणि हिंदू (Hindu) हितसंबंधांचे संरक्षण करण्याचे नियम बनवले जातील. (America)
जर हा कायदा मंजूर झाला तर खलिस्तानी (Khalistani) आणि इस्लामी कट्टरपंथी हिंदूंना त्रास देऊ शकणार नाहीत. जॉर्जियामध्ये संमत झालेल्या कायद्यामुळे अमेरिकेतील इतर राज्यांमध्येही अशाच प्रकारचे नियम लागू करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. सध्या जॉर्जियामध्ये ४० हजारांहून अधिक हिंदू राहतात तर अमेरिकेत २५ लाखांहून अधिक हिंदू राहतात.
गेल्या काही वर्षांत अमेरिकेत हिंदू (Hindu) आणि त्यांच्या मंदिरांवर हल्ल्यांच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. हिंदूफोबिया ट्रॅकरच्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को (San Francisco) आणि न्यूयॉर्कमधील (America) मंदिरांवर खलिस्तानी घटकांनी हल्ले केले आहेत. हिंदूंवर अश्लील टिप्पण्या करण्यात आल्या आहेत. या कायद्यासाठी वकिली करणाऱ्या नॉर्थ अमेरिकन हिंदू कोअलिशनने म्हटले आहे की, “या विधेयकावर सिनेटर शॉन स्टीलसोबत काम केल्याचा आम्हाला अभिमान आहे आणि जॉर्जिया आणि संपूर्ण अमेरिकेतील हिंदूंना पाठिंबा दिल्याबद्दल सर्व सिनेटरचे आभार मानतो.”
याआधीही जॉर्जियामध्ये (Georgia) हिंदूंच्या हिताचे काम सुरू आहे. एप्रिल २०२३ मध्ये, जॉर्जिया सिनेटमध्ये हिंदूफोबियाविरुद्धचा ठराव मंजूर करण्यात आला. जॉर्जिया (Georgia) सिनेटने या ठरावात हिंदू धर्माची प्रशंसा केली आणि म्हटले की, हिंदू धर्म हा अनेक वैविध्यपूर्ण संस्कृती एक भाग आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community