कॅनडातील विनिपेग शहरात बुधवारी, २० सप्टेंबर २०२३ रोजी ठार करण्यात आलेला खलिस्तानी (Khalistani) गँगस्टर सुखदुल सिंग उर्फ सुखा दुनिके याच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने घेतली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने फेसबुक पोस्टद्वारे ही जबाबदारी घेतली आहे. लॉरेन्स बिश्नोई सध्या दिल्लीच्या मंडोली तुरुंगात आहे.
सुखा दुनिके याची हत्या टोळीयुद्धातून झाल्याचे बोलले जात आहे. 15 सप्टेंबर रोजीच्या रात्री विनिपेगमध्ये त्याच्यावर 15 वेळा गोळ्या झाडण्यात आल्या. दुनिकेचा खून कोणी केला, याचा मागमूस अद्याप लागलेला नाही. दुनिके हा पंजाबच्या दविंदर बंबीहा टोळीचा सदस्य होता, जो 2017 मध्ये बनावट कागदपत्रांच्या मदतीने कॅनडाला पळून गेला होता. बंबीहा टोळी आणि लॉरेन्स बिश्नोई टोळी यांच्यात जुने वैर आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये आणखी गुन्हेगारांना मारण्याची चर्चा केली आहे. दुनिके हा खलिस्तानी (Khalistani) दहशतवादी अर्शदीप सिंह उर्फ अर्श दलाचा उजवा हात होता. कॅनडामध्ये बसून तो आपल्या टोळ्यांमार्फत भारतात गुन्हे घडवत असे.
फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे, “सत् श्री अकाल, सर्वांना राम-राम. बंबीहा ग्रुपचा प्रभारी आणि कॅनडातील विनिपेग येथे खून झालेल्या सुखा दुनिकेची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळी घेत आहे. त्याने केवळ पैशाच्या हव्यासापोटी हेरॉईनच्या व्यसनाच्या साहाय्याने अनेक घरे उद्ध्वस्त केली. आमचा भाऊ गुरलाल ब्रार आणि विकी मिड्दुखेडा यांच्या हत्येमध्ये त्याने सर्व काही बाहेर बसून केले आहे.”
Join Our WhatsApp Community