काळा रंग सूर्यप्रकाश शोषून घेत असल्यामुळे उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे वापरणे शक्यतो टाळले जाते. न्यायालयात पक्षकारांची बाजू मांडणारे वकील मात्र याला अपवाद ठरतात. आपल्या पेशाची ओळख सांभाळण्यासाठी दिवसभर त्यांना काळ्या कोटातच वावरावे लागते. तरीही वकिलांना उन्हाळ्यात काळात कोटाचा त्रास होऊ नये, यासाठी दरवर्षी १५ मार्च ते ३० जून या तीन महिन्याच्या कालावधीत काळा कोट न वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, यंदा उन्हाच्या वाढत्या झळांमुळे १५ दिवस आधीच १ मार्चपासून ही मूभा देण्यात आली आहे. (Lawyer Black Coat)
(हेही वाचा – Latur मध्ये भीषण अपघात; दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात ST बस उलटली, 25 प्रवासी जखमी)
महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने (Maharashtra and Goa Bar Council) याबद्दलचे परिपत्रक 27 फेब्रुवारी रोजी जारी केले आहे. यामध्ये दरवर्षी 1 मार्च ते 30 जून पर्यंत ही सूट वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
त्याअनुषंगाने सिव्हिल मॅन्युअलच्या प्रकरण २२ मधील परिच्छेद ६३६ नुसार वकिलांना कोट वापरास सूट देण्यात आली आहे. त्यानुसार, येत्या दि. ३० जूनपर्यंत न्यायालयीने कामकाजात काळ्या कोटचा वापर ऐच्छिक असणार आहे.
महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या परिपत्रकात लिहिले आहे की, “पोशाख नियमांसाठी उन्हाळी महिन्यांचा अर्थ 1 मार्च ते 30 जून दरम्यानचे महिने असा असेल. त्यानुसार, दरवर्षी 1 मार्च ते 30 जून दरम्यान वकिलांना काळे कोट/जॅकेट घालण्यापासून सूट दिली जाईल.”
उन्हाळ्यात काळे कोट घालण्यास सवलत का ?
काळ्या रंगाच्या कपड्यात जास्त गरम होण्याचे मुख्य कारण म्हणजे हा रंग उष्णतेचा शोषण (Absorption) करतो. उन्हाळ्यात काळा कपडा परिधान केल्यानंतर त्यात शोषून घेतलेली उष्णता लवकर परावर्तित (Reflected) होत नाही. त्यामुळे या रंगाच्या कपड्यांमध्ये फार जास्त उष्णता जाणवते. या कारणामुळे उन्हाळ्यात काळे कपडे घालू नये असे सांगितले जाते. या अनुशंगानेच काळ्या कोटचा विचार केला जातो. (Lawyer Black Coat)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community