लक्ष्मणाच्या मूर्तीचं अनावरण झाल्यानंतर आता लवकरच लखनऊचं नाव बदलणार

143

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वीच उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊचं नाव लखनपूर किंवा लक्ष्मणपूर करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. एकीकडे भारतीय जनता पक्षानं आता जशी परिस्थिती आहे तसंच आम्ही पुढे जाऊ, असं स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे भाजपकडे दुसरं काम नसल्याचा आरोप समाजवादी पक्षानं केला. असा डावपेच करून भाजपला देशाचं लक्ष दुसरीकडं वळवायचं आहे. भाजपचं संपूर्ण लक्ष देश विकण्यावर असल्याचा आरोपही सपानं केला आहे.

दरम्यान गुरुवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लक्ष्मणाच्या २ फूट उंच आणि १२०० किलो वजनाच्या विशाल पुतळ्याचं उद्घाटन केलं. नोएडातील प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी ५० लाख खर्च करून ही मूर्ती तयार केली आहे. पुतळ्याच्या उद्घाटनाबरोबर भाजपनं एका दगडात दोन पक्षी मारण्याचा घाट घातल्याची चर्चा आहे. तसंच आता भाजपनं लखनऊचं नाव बदलण्यासाठी कंबरी कसल्याचं म्हटलं जात आहे.

यापूर्वी लखनऊ नाव बदलण्याची केली होती मागणी 

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत लखनऊचं नाव बदलून लक्ष्मणपुरी करण्याची मागणीही जोर धरू लागली होती. त्यानंतर २०१७च्या विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा गाजला होता, मात्र दोन्ही वेळा हे प्रकरण थंडबस्त्यात गेलं होत. मे २०१८मध्ये भाजप नेते लालजी टंडन यांचं ‘अनकाहा लखनऊ’ हे पुस्तक समोर आलं, ज्यामध्ये त्यांनी भगवान लक्ष्मण आणि लखनऊ यांच्यातील संबंध सांगितलं होत. त्याचप्रमाणं, १६ मे २०२२ रोजी पंतप्रधान मोदींचं स्वागत करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका ट्विटमध्ये लखनऊचे वर्णन भगवान लक्ष्मणांचं शहर असं केलं होत.

(हेही वाचा – पंतप्रधान मोदी शुक्रवारी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.