Laxmikant Dixit : रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करणारे लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन!

342
Laxmikant Dixit : रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करणारे लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन!
Laxmikant Dixit : रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करणारे लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन!

अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram mandir) रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित (Laxmikant Dixit) यांचे शनिवारी (२२ जून) निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर वाराणसीमध्ये (Varanasi) उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Laxmikant Dixit)

(हेही वाचा –Nitesh Rane: ‘हिंदुधर्म रक्षक…’, नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मातोश्री’बाहेर झळकले बॅनर!)

पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित (Laxmikant Dixit) यांची अंतिम यात्रा त्यांच्या मंगळागुरी या निवासस्थानापासून सुरू होणार आहे. तर त्यांच्या पार्थिवावर मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लक्ष्मीकांत दीक्षित हे यजुर्वेदाचे उत्तम अभ्यासक असण्यासोबतच उपासना पद्धतीचेही जाणकार मानले जात होते. लक्ष्मीकांत दीक्षित यांचे मूळचे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील जेऊरचे कुटुंब अनेक पिढ्यांपूर्वी काशी येथे स्थायिक झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीकांत दीक्षित यांनी त्यांचे काका गणेश दीक्षित यांच्याकडून वेद आणि विधींची दीक्षा घेतली होती. (Laxmikant Dixit)

कोण होते लक्ष्मीकांत दीक्षित? (Laxmikant Dixit)

रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यात लक्ष्मीकांत यांचा पुजाऱ्यांच्या संघात समावेश होता. राम मंदिराच्या अभिषेकात त्यांनी १२१ पुरोहितांचे नेतृत्व केले होते. लक्ष्मीकांत दीक्षित हे वाराणसीच्या मीरघाट येथील सांगवेद महावि‌द्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक होते. त्यांना काशीतील यजुर्वेदाचे महान विद्वान म्हणून ओळखले जात होते. त्यांची भारतीय सनातन संस्कृती आणि परंपरेवर नितांत श्रद्धा होती. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकातही दीक्षित घराण्याच्या जुन्या पिढ्यांचे योगदान असल्याचे सांगितले जाते. (Laxmikant Dixit)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.