पिंपरी चिंचवड शहरामधील एका जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिकेज (Swimming Pool Gas Leak) झाल्याने पोहण्यासाठी आलेल्या २० ते २५ जणांना श्वास घेण्यास त्रास झाला. तर १० ते १२ जण या त्रासाने बेशुद्ध पडले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ स्थानिक पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बेशुद्ध पडलेल्या नागरिकांना यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ही घटना आज म्हणजेच मंगळवार १० ऑक्टोबर रोजी सकाळी आठच्या सुमारास कासारवाडी परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार,कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात (Swimming Pool Gas Leak) सकाळी २० जण पोहण्यासाठी आले होते. त्याचबरोबर या ठिकाणी देखभाल करणारे आणि सुरक्षारक्षक देखील होते. तलावात पोहताना मात्र अचानक अनेक जणांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला तसेच परिसरात क्लोजिंग गॅस पसरल्याने काही मीटर पर्यंत नागरिकांना खोकला, गळ्याचा त्रास आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर जलतरण तलावातील बेशुद्ध पडू लागले.
(हेही वाचा – Ayodhya Shri Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिराचे ६० टक्के काम पूर्ण; जाणून घ्या कशी आहे तयारी?)
स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी (Swimming Pool Gas Leak) पोहोचले असून त्यांनी कासारवाडी येथील स्विमिंग पूलाच्या समोरून जाणारी वाहतूक बंद केली आहे. त्याचबरोबर बेशुद्ध पडलेल्या आणि श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या महापालिका सुरक्षारक्षक, जीवरक्षक यांच्यासह पोहण्यास आलेल्या नागरिकांना वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी वायसीएम रुग्णालयाला भेट दिली.
या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा (Swimming Pool Gas Leak) हलगर्जीपणा समोर आलेला आहे. आता महानगरपालिका कोणावर कारवाई करणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community