Leakage of Water : वांद्रे पश्चिम येथील मुख्य जलवाहिनीतून पाण्याची गळती; दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु

135

वांद्रे पश्चिम येथील स्वामी विवेकानंद मार्गावर लकी जंक्शन येथे पाली जलाशयाला पाणी पुरवठा करणाऱ्या २ जलवाहिन्या पैक्की एका ६०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला रात्री २ वाजेच्या सुमारास अचानक गळती सुरु झाली आहे.

पाणी गळती रोखण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. महानगरपालिकेचा चमू अथक प्रयत्न करत आहे. (Leakage of Water)

(हेही वाचा – Punjab News : भारतीय हद्दीत घुसलेला पाकिस्तानी घुसखोर ठार; पाकिस्तानने मागितला नाही मृतदेह)

जलवाहिनीच्या गळतीमुळे एच पश्चिम विभागाचा पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असून दुरुस्ती काम पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार आहे. तथापि, काही भागात वेरावली जलाशय व उर्वरित दुसऱ्या पाली इनलेट द्वारे कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

उपरोक्त कालावधीत नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. (Leakage of Water)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.