इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (आयएसएस) (International Space Station) संदर्भात नासाचा एक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, आयएसएस धोक्यात आहे. तिथे उपस्थित असलेल्या सुनीता विल्यम्ससह (Sunita Williams) इतर अंतराळवीरांच्या जीवाला धोका असल्याचंही समोर आलं आहे. गेल्या पाच वर्षांपासून आयएसएसमध्ये थोडीशी गळती सुरू होती. मात्र, आता किमान 50 ठिकाणी गळती होत असल्याचं समोर आलं आहे. याशिवाय आयएसएसला भेगा देखील पडल्या आहेत.
(हेही वाचा-Maharashtra Assembly Elections : ‘वारं फिरलंय’ लक्षात येताच, शरद पवार शिरले संजय राऊतांच्या भूमिकेत!)
सीएनएनने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, नासाचे अंतराळवीर बॉब कॅबाना यांनी या गळतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कॅबाना म्हणाले की, गळती थांबवण्यासाठी डागडुजी केल्यास थोड्या काळासाठी फायदा होऊ शकतो. पण, हा कायमस्वरूपीचा उपाय नाही. अमेरिकेचं म्हणणं आहे की, हा प्रकार सुरक्षित नाही. 2019 मध्ये गळती होत असल्याचं पहिल्यांदा आढळलं होतं. एप्रिल 2024 पासून, दररोज 1.7 किलो दराने हवेची गळती सुरू झाली. आयएसएसमध्ये साधारणपणे सात ते दहा अंतराळवीर राहतात. रशियन इंजिनिअर्सना तिथे मायक्रो व्हायब्रेशन्स जाणवली आहेत. हा धोका टाळण्यासाठी नासाने (NASA) काही पावलं उचलली आहेत. याशिवाय तिथे उपस्थित असलेल्या अंतराळवीरांनाही अतिरिक्त खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Sunita Williams)
(हेही वाचा-Assembly Elections : ‘मुंबईकर व्होटकर’ अशाप्रकारे घोषणा देत पश्चिम उपनगरांत बाईक रॅलीद्वारे जनजागृती)
सध्या नासाचे सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि बूच विल्मोर (Butch Wilmore) हे दोन अंतराळवीर आयएसएसमध्ये अडकले आहेत. ते फेब्रुवारी 2025 अखेरपर्यंत स्पेस स्टेशनवर राहतील. त्यानंतर त्यांना स्पेसएक्सच्या ड्रॅगन क्रू मोहिमेद्वारे पृथ्वीवर आणलं जाईल. पुढील वर्षाच्या सुरुवातीला स्पेसएक्स क्रू-9 द्वारे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परत येऊ शकतील. अशी माहिती आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community