हिंदी आमची माता आहे. मात्र, आम्ही मातृभाषेला आदर दिला आहे. तुमच्या धाडस असेल तर मेडिकल आणि इंजीनिअरिंगचा कोर्स तामिळमध्ये करून दाखवा. आमचे सरकार आल्यावर आम्ही हे करून दाखवू. हजारो किमी दूरवरची भाषा तुम्ही शिकू शकता, मात्र आपल्या देशातील भाषेशी अडचण आहे. शाह म्हणाले, जे भ्रष्टाचा लपवण्यासाठी भाषेची मदत घेतात, आम्ही गावोगावी जाऊन त्यांना उघडे पाडू, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दक्षिणेतील (Tamil Nadu) भाषिक वाद उफाळून आणणाऱ्या नेत्यांना दिला. ते राज्यसभेत गृह मंत्रालयाच्या कामाकाजावरील चर्चेला उत्तर देत होते.
(हेही वाचा – मुंबईतील सर्व जाहिरात फलकांचे तीन महिन्यात लेखापरीक्षण; मंत्री Uday Samant यांची माहिती)
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन (M K Stalin) यांनी केंद्र सरकारने हिंदी (Hindi) भाषा लादण्याचा प्रयत्न केल्यास भाषा युद्ध पुकारू, अशी दर्पोक्ती केली आहे. त्याविषयी गृहमंत्री बोलत होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, मोदी सरकारने कलम ३७० रद्द करून घटनाकारांचे स्वप्न पूर्ण केले आहे. एक वेळ होती, जेव्हा काश्मीरमध्ये गोळीबार होत होता. कोणताही सण स्फोटकांशिवाय साजरा होत नव्हता. मात्र, कोणतेही सरकार बोलत नव्हते. बोलण्यास घाबरत होते. मात्र, आम्ही फक्त १० दिवसांत बालाकोट सर्जिकल स्ट्राइक करून सांगितले की, आम्ही सहन करणार नाहीत. सरकार दहशतवादाप्रति शून्य सहिष्णूता धोरण अवलंबत आहे. हुर्रियतवाले काश्मीरमध्ये गदारोळ करतात. आमच्या सरकारने हुर्रियतला जमिनीत गाडले आहे. २०१९ ते २०२४ पर्यंत हुर्रियतसारख्या १४ संघटनांवर बंदी घातली आहे.
सरकारने शुक्रवारी संसदेत सांगितले की, जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत ३८८ भारतीय नागरिकांना अमेरिकेतून निर्वासित केले आहे. यापैकी ३३३ भारतीयांना फेब्रुवारीत ३ वेगवेगळ्या विमानांनी थेट अमेरिकेतून भारतात निर्वासित केले. विदेश राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह म्हणाले, अमेरिकेने पनामाद्वारे ५५ भारतीय नागरिकांना निर्वासित केले. (Amit Shah)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community