सामान्यांच्या खिशाला कात्री! १ जुलैपासून काय बदल होणार? जाणून घ्या…

75

येत्या १ जुलैपासून अनेक क्षेत्रात बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर आणि अर्थात आर्थिक गणितं बदलणार आहेत. बॅंकिंग-टॅक्सेशन आणि शेअर बाजारातील ट्रेडिंगसह अनेक महत्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत.

( हेही वाचा : Atal Pension Yojana : महिन्याला भरा फक्त २१० रुपये! निवृत्तीनंतर होणार मोठा फायदा)

SBI बॅंकेसंबंधित नियमांमध्ये बदल

SBI बॅंकेमध्ये तुमचे बेसिक सेव्हिंग डिपॉझिट खाते असल्यास, तुम्ही एका महिन्यात केवळ चार वेळा ATM मधून पैसे काढू शकता. जर तुम्ही चारपेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर तुम्हाला १५ रुपये अधिक GST भरावा लागणार आहे.

गिफ्ट्सवर १० टक्के टीडीएस

व्यवसायिकांकडून मिळणाऱ्या गिफ्ट्सवर १० टक्के टीडीएस लागणार आहे. हा कर सोशल मिडीया Influencer आणि डॉक्टर यांनाही लागू असेल. कंपनीने मार्केटिंगसाठी दिलेल्या उत्पादनांवर Influencer ला टीडीएस भरावा लागणार आहे. तसेच डॉक्टरांना औषधांच्या फ्री सॅम्पल्सवर कर द्यावा लागेल.

आधार-पॅन लिंक करा

तुम्ही अद्याप तुमचे आधार-पॅन लिंक केले नसेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमचे आधार-पॅन लिंक करा याची शेवटची तारीख ३० जून आहे. ३० जूननंतर तुमचे आधार-पॅन लिंक नसल्यास तुम्हाला १ हजार रुपये दुप्पट दंड भरावा लागेल.

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTO ला जाण्याची आवश्यकता नाही

नवीन नियमानुसार १ जुलैपासून शिकाऊ वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी तुम्हाला आता RTO कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही नोंदणीकृत प्रशिक्षण कार्यालयातून गाडी चालवायला शिकलात तर तुम्हाला प्रशिक्षण घेतल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल.

एसी-बाईक होणार महाग

ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सीने एसीच्या एनर्जी रेटिंग नियमात १ जुलैपासून बदल केले आहेत. त्यामुळे एसीच्या किंमती १० टक्क्यांनी वाढतील. तसेच हीरो मोटोकॉर्पने आपल्या वाहनांच्या किमती ३ हजार रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत.

क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना भरावा लागणार कर

क्रिप्टो चलनातील व्यवहार एक वर्षाच्या कालावधीत १० हजारांपेक्षा अधिक असल्यास १ टक्का टीडीएस द्यावा लागेल.

गॅस सिलिंडरच्या किमतीत सुधारणा

गॅस सिलिंडरच्या किमती दर महिन्याच्या १ तारखेला बदलली जाते. १ जुलै रोजी एलपीजीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.