लेबनॉन साखळी बॉम्बस्फोटाने हादरले आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये तब्बल दोन हजार ७५० लोक जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत हिजबुल्लाहचे सैनिक आणि आरोग्य कर्मचारीही जखमी झाले आहेत. लेबनॉनमधील एक राजदूतही जखमी झाले असल्याची माहिती सांगितली जात आहे.
(हेही वाचा – न्यूयॉर्कमध्ये Swaminarayan Temple मध्ये तोडफोड; पंतप्रधानांविरोधात लिहिल्या घोषणा)
लेबनॉनच्या आरोग्यमंत्र्यांच्या हवाल्याने रॉयटर्सने वृत्त दिले आहे की, देशभरातील पेजर स्फोटांमध्ये २,७५० लोक जखमी झाले आहेत. तसेच या स्फोटमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच लेबनॉनमधील इराणचे राजदूत मोजतबा अमानी हे या स्फोटात जखमी झाले आहेत. लेबनॉनच्या काही भागात एकाच वेळी शेकडो हॅन्डहेल्ड पेजरचा स्फोट झाला. ज्यात हिजबुल्लाहचे सदस्य, इराणचे राजदूत आणि इतर शेकडो नागरिक जखमी झाले आहेत.
हिजबुल्लाने जारी केले निवेदन
हिजबुल्लाहने पेजरच्या स्फोटानंतर लगेचच एक निवेदन जारी केले. हिजबुल्लाहचे सदस्य आणि विविध संस्थांतील अधिकाऱ्यांनी वापरलेल्या अनेक पेजरचा स्फोट झाला. या घटनेत तर अनेकजण जखमी झाले.
या घटनेनंतर हिजबुल्लाहचे संबंधित अधिकारी या स्फोटांचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. एका अधिकाऱ्याने इस्रायलबरोबरच्या जवळपास वर्षभर चाललेल्या संघर्षातील सर्वात मोठी सुरक्षेतील त्रुटी असल्याचे सांगितले. तसेच या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिजबुल्लाह आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हे स्फोट झाले असल्याचेही सांगितले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community