रमेश शिंदे
प्रभू श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याप्रकरणी चित्रलेखाचे माजी संपादक ज्ञानेश महाराव यांच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे. ज्ञानेश महाराव (Dyanesh Maharao), श्याम मानव (Shyam Manav) हे डाव्या इकोसिस्टीमचा एक भाग आहेत. चित्रलेखातून निवृत्तीनंतर ५ वर्षे तो कुंडीत पडलेला होता, अचानक समोर येऊन हे बोलत आहे? कालपर्यंत हे कुठेच दिसत नव्हते; पण निवडणुका आल्याने ते सक्रीय झाले आहेत आणि त्यांच्या भूमिका बजावत आहेत. (Leftists)
रामगिरी महाराज आणि ज्ञानेश महाराव यांना वेगळा न्याय का ?
महाराष्ट्रात रामगिरी महाराजांवर महम्मद पैगंबर यांच्याविषयी एक शब्द बोलल्याने तत्परतेने कायदेशीर कारवाई झाली, त्याच पद्धतीने कायदेशीर कारवाई यांच्यावर का होत नाही? कोल्हापूरमधील हिंदुत्वनिष्ठ दिवसभर पोलीस ठाण्यात बसले होते आणि त्यांनी पोलिसांना हाच प्रश्न विचारला. येथे कारवाई करण्यासाठी एवढा वेळ का लागत आहे? श्रीराममंदिराच्या उद्घाटनासाठी देशातील सर्व मोठे लोक जातात, पंतप्रधान जातात, त्या प्रभू श्रीरामावर टीका होते, तेव्हा कारवाईला विलंब का होतो ?
जो प्रभू श्रीरामाचा नाही, तो आमचा नाही
छत्रपतींचे वंशज असणारे शाहू महाराज या मंचावर उपस्थित होते, अन्य लोकप्रतिनिधीही तिथे उपस्थित होते, त्यांनी कुणीही ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याचा निषेध केला नाही. ‘जो प्रभू श्रीरामाचा नाही, तो आमचा नाही’ हे आता हिंदू समाजाने सांगायला हवे. एकीकडे प्रभू श्रीरामाचा अवमान करूनही केवळ दिखावा करण्यासाठी लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले; मात्र ‘हिंदू समाज आता याला फसणार नाही’, असे आता हिंदू समाजाने सांगायला हवे.
महाराव यांना कुणाचे साहाय्य ?
मागे ज्ञानेश महाराव यांनी हिंदूद्वेषी डॉ. झाकीर नाईक (Hindu hater Dr. Zakir Naik) आणि एम्.एफ्. हुसैन यांच्या चित्रावरून हिंदू जनजागृती समितीविषयी (Hindu Janjagruti Samiti) एक लेख लिहिला होता. त्या लेखाविरोधात आम्ही न्यायालयात याचिका केली. ‘तुम्ही जिथे सांगाल तिथे येऊन रस्त्यावरही क्षमा मागायला मी तयार आहे. तुम्ही माझ्यावर कारवाई करू नका’, असे महाराव यांनी त्या वेळी आम्हाला सांगितले होते. हा घाबरट माणूस आहे. त्यांच्यात धैर्य नाही. त्यामुळे प्रभू श्रीरामाविषयी अवमानकारक वक्तव्य करण्यासाठी कुणीतरी त्याला साहाय्य केले आहे. (Leftists)
लोकांना भ्रमित करण्याचे कारस्थान
मूळ संभाजी ब्रिगेडमध्ये फूट पडली आहे. या नावाच्या ३-४ संघटना सुरू आहेत. त्यामुळे एका संघटनेचा कार्यक्रम झाला, तर बाकीचे त्याला नाकारतात. ही लोकांना भ्रमित करण्याची पद्धत आहे. शिवसेना, पू. संभाजीराव भिडे यांना आव्हान देण्यासाठी आणि राजकीय हेतूने शरद पवार यांनी संभाजी ब्रिगेड नावाने बनवलेल्या या संघटनेने ब्राह्मणांच्या विरोधात चुकीचे लिखाण केले आहे. ‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे नाव न घेणे’, ‘जगद्गुरु तुकाराम महाराजांचा खून ब्राह्मणांनी केला’, असे सांगणे अशा गोष्टी यांनी केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही हेच सांगतात. ते हिंदू धर्माच्या विरोधात बोलतात. शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाडांवर कधी कारवाई केली नाही. ‘सेव्ह गाझा’चे (गाझा वाचवा, असे लिहिलेले)‘टी शर्ट’ घालून फिरणाऱ्यांना त्यांनी सांगितले नाही की, गाझा आणि भारत यांचा संबंध नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी पाहता ही सर्व ‘डावी हिंदुविरोधी यंत्रणा’ (इकोसिस्टीम) आहे, असे म्हणावे लागेल.
(लेखक हिंदु जनजागृती समितीचेराष्ट्रीय प्रवक्ते आहेत.)
श्रीराम आणि सीता हे साक्षात आदी नारायण आणि जगत् जननी होते!
अहिल्येचा उद्धार करणाऱ्या श्रीरामांना सीतेचे पावित्र्य ठावूक नसेल का? ज्ञानेश महाराव जे सांगत आहेत, त्यात काही तरी तथ्य आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना हे समजून घ्यायचे असेल, तर हे लक्षात घ्यायला हवे की, प्रभु श्रीराम हे साक्षात नारायण आणि सीतामाता ही जगत् जननी होती. त्यांनी उदाहरण दिल्याप्रमाणे दाऊदच्या लोकांना घेऊन फिरणारे हे माजी मंत्री नव्हते किंवा मुसलमान वस्तीत बाँबस्फोट न होऊनही ‘तो झाला’ म्हणणारे कुणी मुख्यमंत्री नव्हते. ज्या प्रभू श्रीरामाने केवळ चरणस्पर्शाने माता अहिल्येचा उद्धार केला, त्यांना माता सीतेच्या पवित्रतेविषयी ठाऊक नसेल का? किती मूर्खपणाची गोष्ट करत आहेत? अरण्यकांडात याचा उल्लेख येतो, तिथे प्रश्नाला उत्तर देतांना स्वतः प्रभू श्रीराम म्हणतात, ‘मी सीतामातेला जाणतो आणि माझ्या मनात तीच पवित्रतेची भावना आहे; परंतु तिन्ही लोकांत असे काही लोक आहेत, ज्यांच्या मनात असा काही भ्रम राहिला असेल, त्यामुळे तिची शुद्धता पूर्ण विश्वाला दाखवू इच्छितो.’ असा प्रभू श्रीराम त्रिकालदर्शी होता.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community