महागाई पाठ सोडेना! आता लिंबाने टाकले पेट्रोलला मागे

135

यावर्षी तापमानाने सगळे रेकाॅर्ड मोडले आहेत. त्यामुळे उन्हाने लाही-लाही झालेली लोकं आता शीतपेयांकडे वळली आहेत. उन्हाळा म्हटलं की, लिंबू सरबत आलेच. उन्हाळ्यात लिंबाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अशा परिस्थितीत वाढती मागणी पण पुरवठा मंदावल्याने लिंबाच्या दरात कमालीची वाढ होताना दिसत आहे. सध्या लिंबू 200 रुपये किलोवर पोहोचले आहे.

भाव वाढल्याने ग्राहक कमी

गुजरातमधील राजकोटमध्ये लिंबू प्रति किलो 200 रुपये पोहोचले आहे. याआधी लिंबू 50 ते 60 किलो दराने मिळत होते. प्रत्येक गोष्टीत झालेल्या दरवाढीने आमचे बजेट कोलमडले आहे. भाव कधी खाली येतील माहिती नाही, अशी प्रतिक्रिया एका ग्राहकाने दिली आहे. आधी दर आठवड्याला एक किलो लिंबूंची खरेदी करत होतो. आमच्या खर्चावर परिणाम झाला आहे. या किमती वाढल्याने व्यापा-यांनाही फटका बसला आहे कारण अचानक भाव वाढल्याने ग्राहक कमी माल खरेदी करत आहेत.

( हेही वाचा: शरद पवारांच्या निकटवर्तीयाची ईडीकडून चौकशी; प्रकरण 500 कोटींच्या घरात! )

लिंबाचे फायदे

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी लिंबाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पचनसंस्था सुरळित राखण्यास मदत होते. लिंबू शरीराची कार्ये टिकवून ठेवण्यास आणि रोगप्रतिकारक शक्तीचे नियमन करण्यास मदत करते. लिंबू हा पचन क्रिया मजबूत करणारा रस तयार करतो. तसेच, लिंबाने रक्त शुद्ध होते,  लिंबू कोलेरा आणि मलेरिया दरम्यान उपचार म्हणून वापरला जातो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.