फिल्मसिटीमध्ये आढळला बिबट्याचा मृतदेह, शवविच्छेदन अहवालात समोर आले मृत्यूचे कारण

गोरेगाव येथील फिल्मसिटी परिसरात रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास बिबट्याच्या बछड्याचा मृतदेह आढळून आला. फिल्मसिटीच्या प्रवेशद्वारापासून अगदी काही अंतरावरच बछड्याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती स्थानिकांनी वनविभागाला दिली. बछड्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले असून, झाडावरून पडल्याने डोक्याला मार लागला असावा, असा अंदाज ठाणे वनविभाग(प्रादेशिक)च्या सहायक वनसंरक्षक गिरीजा देसाई यांनी दिली आहे.

वनाधिका-यांकडून पाहणी

फिल्मसिटीच्या मुख्य प्रवेशद्वाजवळच असलेल्या रस्त्यापासून अगदी शंभर मीटर अंतरावर बिबट्याचा मृतदेह रविवारी सकाळी आढोळून आला. त्यामुळे सुरुवातीला बिबट्याला वाहनाची धडक लागल्याची भीती वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. ही घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास उघडकीस आली. वनाधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आजूबाजूच्या जागेची वनाधिकाऱ्यांनी पाहणी केली. परिसरात कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आला नाही, असे देसाई यांनी सांगितले.

(हेही वाचाः 70 वर्षीय आईच्या मरणानंतर केली इच्छा पूर्ण आणि केले अवयवदान)

शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल

बिबट्याच्या बछड्याचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शवविच्छेदन केले गेले. मृत नर बछडा नऊ महिन्यांचा आहे. बछड्याला श्वसनाचा त्रास होता तसेच तो अशक्त देखील होता. डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने बछड्याचा मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक शवविच्छेदन अहवालात दिली गेली आहे. उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकऱ्यांच्या टीमने मुंबई पशुवैद्यकीय रुग्णालयच्या टीमसह बिबट्याचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनाचा तपशीलवार अहवाल प्रलंबित आहे. दरम्यान व्हिसरा नमुने फॉरेन्सिक तपासासाठी सोमवारी पाठवले जातील, असे वनाधिका-यांकडून सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here