सांगलीत अज्ञात वाहनाची बिबट्याला धडक आणि नंतर बिबट्या गायब

165

सांगली येथील शिरोळा येथे शनिवारी रात्री दहाच्या सुमारात अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली. या धडकेत बिबट्या जागीच बराच काळ निपचित पडून राहिला. शिराळा येथील शेंगडेवाडी येथे ही घटना घडली. घटनेनंतर लोकांनीच बिबट्यावर पाणी शिंपडले. बिबट्या बेशुद्धावस्थेतूनच जागे होत स्वतःहून चालत जवळच्या झाडीत लपून बसला. बिबट्याच्या शरीरावर जबर जखमा नसल्या तरीही वनविभागाने बिबट्याला शोधण्याची मोहिम हाती घेतल्याची माहिती सांगली वनविभागाचे साहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे यांनी दिली.

बिबट्याला मुका मार लागला असण्याची शक्यता

शेंगडेवाडी येथे रात्री रस्त्यावर निपचित पडलेल्या बिबट्याला पाहून लोकांनी त्याचे फोटो काढत सोशल मिडीयावर व्हायरल करायला सुरुवात केली. एकाने वनविभागाला याबाबतची माहिती दिली. मात्र वनाधिकारी पोहोचेपर्यंत बिबट्या स्वतःहून उठून नजीकच्या झुडूपात जाऊन बसला. ही घटना वनरक्षकानेही पाहिली. टीम गोळा करुनही केवळ रात्र असल्याने बिबट्याला पकडणे थोडे आव्हानात्मक होते, अशी प्रतिक्रिया डॉ. साजणे यांनी दिली. घटनेचा पंचनामा केला असता रस्त्यावर रक्ताचा छोटा डाग आढळून आला. त्या आधारे बिबट्याला मुका मार लागला असावा, असा अंदाज वनाधिका-यांनी व्यक्त केला. सकाळी वनविभागाने पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली असता बिबट्या झुडूपात आढळून आला नाही. अपघात झालेल्या ठिकाणाच्या जवळपास आम्ही कॅमेरा ट्रेप लावले असून बिबट्याचा शोध सुरु असल्याची माहिती डॉ. साजणे यांनी दिली.

(हेही वाचा हलाल प्रमाणपत्र देणारी संघटना दहशतवाद्यांना करतेय अर्थपुरवठा, चौकशीची मागणी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.