कसा-यात बिबट्याला पकडले

146

कसारा येथे बिबळवाडी येथे रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून बिबट्या दिसून येत होता. बिबट्या एकाच जागी बसून आल्यानंतर स्थानिकांना दर्शन होत होते. अखेरीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यप्राणी बचाव पथकाने बिबट्याला रविवारी दुपारी बिबट्याला जेरबंद केले.

crismas

नेमके प्रकरण काय?

कसारा येथील इगरपुरी महामार्गाजनीकच्या बिबळवाडी डोंगरातील गावाजवळ येऊन बसला. स्थानिकांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली. बिबट्याच्या हालचाली होत नसल्याने वनाधिका-यांनी त्याला पकडून उपचार करण्याचा निर्णय घेतला. बिबट्याजवळ बघ्यांची गर्दी होऊ नये म्हणून वनाधिका-यांनी लोकांना डोंगरावर जाण्यापासून मज्जाव केला. दुपारी चारच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यासाठी बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वन्यप्राणी बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात वनाधिका-यांना यश आले. अंदाजे नऊ वर्षांचा बिबट्या अशक्त असल्याने त्याला उपचारांसाठी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उपचारांसाठी रवाना करण्यात आले आहे.

(हेही वाचा 2,50,000 नागरिकांना गिळंकृत करणारी ख्रिसमसनंतरची ‘ती’ काळरात्र)

कार्यवाहीचे पथक 

बिबट्या जेरबंद करण्याचे ऑपरेशन शहापूर वनविभाग (प्रादेशिक)चे उपवनसंरक्षक सचिन रेपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या ऑपरेशनमध्ये वनपरिक्षेत्रपाल चेतना शिंदे, वनपरिक्षेत्रपाल विशाल गडदे आणि शहापूर प्रादेशिक वनविभागाच्या वनाधिका-यांची टीम यांनी सहभाग घेतला. बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन्यप्राणी बचाव पथकाचे प्रमुख विजय बारब्दे यांच्या टीमने यशस्वीरित्या जेरबंद केले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.