Pakistan : पाकिस्तानात आणखी एका आतंकवाद्याचा खात्मा; हाफिज सईद अडचणीत

पाकिस्तानमध्ये भारतविरोधी दहशतवाद्यांच्या हत्येची मालिका चालू आहे. जगभरात दहशतवाद पसरवणाऱ्या लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) दहशतवादी मुफ्ती कैसर फारुक याची कराचीमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. ही घटना सिंध प्रांतात घडली.

188
Pakistan : पाकिस्तानात आणखी एका आतंकवाद्याचा खात्मा; हाफिज सईद अडचणीत
Pakistan : पाकिस्तानात आणखी एका आतंकवाद्याचा खात्मा; हाफिज सईद अडचणीत

पाकिस्तानमध्ये भारतविरोधी दहशतवाद्यांच्या हत्येची मालिका चालू आहे. (Pakistan) जगभरात दहशतवाद पसरवणाऱ्या लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) दहशतवादी मुफ्ती कैसर फारुक याची कराचीमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. ही घटना सिंध प्रांतात घडली. मुफ्ती कैसर फारुक हा हाफिज सईदचा जवळचा सहकारी होता. कराचीच्या सोहराब गोठ येथील पोर्ट कासिम येथील जामिया मस्जिद अबुबकरचे इमाम मुफ्ती कैसर फारूक मशिदीजवळ पोहोचला, तेव्हा २ अज्ञात दुचाकीस्वारांनी त्याच्यावर गोळीबार केला. तो खैबर पख्तूनख्वाच्या डेरा इस्माईल खानचा रहिवासी होता. (Pakistan)

(हेही वाचा – India vs Canada : ब्रिटनमध्ये भारतीय उच्चायुक्तांसोबत गैरवर्तन, भारताकडून संताप व्यक्त)

दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक सदस्य हाफिज सईद हा भारतातील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. मुंबईतील हल्ल्यात 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.  संयुक्त राष्ट्रसंघानेही हाफिज सईदला जागतिक दहशतवादी यादीतही टाकले आहे. याशिवाय हाफिजवर अमेरिकेने 83 कोटी रुपयांचे बक्षीसही ठेवले आहे. त्याला जुलै 2019 मध्ये टेरर फंडिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांत लष्कर-ए-तोयबाच्या अनेक आतंकवाद्यांची भर दिवसा हत्या करण्यात आली आहे. नुकतेच मौलाना झियाउर रहमान या मौलवीची कराचीमधील गुलिस्तान-ए-जौहर येथील उद्यानात दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. तो जामिया अबू बकर नावाच्या मदरशात प्रशासक म्हणून काम करत होता. मदरशातून तो दहशतवादी कारवाया करत होता.सप्टेंबरमध्ये रावळकोटमधील अबू कासिम काश्मिरी आणि नाझिमाबादमधील कारी खुर्रम शहजाद या लष्कर-ए-तोयबाच्या इतर २ कार्यकर्त्यांचीही हत्या झाली आहे. (Pakistan)

काही दिवसांपूर्वीच हाफिज सईदच्या मुलगा कमालुद्दीन सईद याचे अपहरण झाल्याचा आरोप झाला होता. त्याने त्याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. हाफिज सईदच्या मुलाचे अपहरण करून नंतर त्याचा मृतदेह सापडल्याच्या दाव्याबाबत अद्याप कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. त्याला आयएसआयच्या संरक्षणात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आल्याचे समजते. (Pakistan)

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.