आधी लेटरबॉम्ब नंतर अधिका-याने मागितली माफी!

137

महसूल विभागाच्या अधिकार्‍यांकडील अधिकार हे आरडीएक्स प्रमाणे आहेत. त्यातून जीवंत बॉम्ब तयार होत आहेत. तो भूमाफियांच्या मर्जीप्रमाणे वागत आहेत. हे भूमाफिया महसूल अधिकार्‍यांना धरून सामान्यांची छळवणूक करत आहेत. त्यामुळे कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घ्यावेत, अशा आशयाचे  नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांचे पत्र राज्यात खळबळ उडवून गेले. त्यामुळे साहजिकच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात चर्चेत आले. त्यानंतर काही तासांतच आयुक्त पांड्ये यांनी जाहीर माफी मागितली. तसा व्हिडिओ त्यांना प्रसारित केला.

मालेगाव सारख्या शहराला आयुक्तालयाचा दर्जा  

दीपक पांडे यांनी 2 एप्रिलला हे पत्र महासंचालकांना पाठवले आहे. त्यामध्ये भूमाफियाकडून नागरिकांची सुटका होण्यासाठी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी महसूल अधिकार्‍याकडील कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात शहरीकरण, औद्योगिकरण, आधुनिकीकरण जेथे झाले आहे तेथे अधिकार पोलिस आयुक्तालयाच्या हातात द्यावेत, मालेगाव सारख्या शहराला आयुक्तालयाचा दर्जा द्यावा अशी मागणी देखील दीपक पांडे यांनी केली. जिल्हा दंडाधिकारी कार्यालय येथे दंडाधिकारी शाखा आणि पोलीस आयुक्त कार्यलयात असणारी दंडाधिकारी शाखा यांच्या कामाचे स्वरूप एकच असल्याने जिल्हा दंडाधिकारी शाखा पोलीस आयुक्त कार्यालय विलीन कराव्यात, ग्रामीण पोलीस दलाचे आयुक्तालयात विलीनीकरण करावे याने साधन संपत्तीची बचत होईल, असेही दीपक पांडे यांनी पत्रात म्हटले आहे.

(हेही वाचा एसटी सुरु करा, नाहीतर खुर्ची खाली करा! शाळकरी मुलाची आर्त हाक)

कमी भावात भुमाफिया जमिनी लाटतात   

राज्यात महसुली दंडाधिकाऱ्यांचे जमीनविषयक अधिकार महसुली जिल्हे ही संकल्पना बंद करुन त्याऐवजी भुमाफियागिरी वाढल्याने नाशिकसह ७ जिल्ह्यात आयुक्तालये संकल्पना राबविली जावी, अशी मागणी करीत पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी आणखी एक लेटर बॉब टाकला.पोलिस महासंचालकांसह राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना पाठविलेल्या या पत्राने महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे .दंडाधिकाऱ्यांच्या फौजदारी व महसुली अधिकारानुसार सामान्य नागरिकांना भूमाफिया अडकवितात. दाव्यात अडकलेल्या जमीन मालकांकडून कमी भावात भुमाफिया त्यांच्या जमिनी लाटतात. त्यामुळे स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. महसूल अधिकारी आरडीएक्स तर दंडाधिकारी हे डिटोनेटर झाले आहे. या दोहोंच्या भ्रष्ट युती म्हणजे जिवंत बॉब बनले आहेत. असा सणसणीत घाव त्यांनी महसूल यंत्रणेतील त्रुटीवंर पोलीस आयुक्त पांडे यांनी घातला आहे.

मंत्री थोरात चांगले! 

यानंतर पोलीस अधिकारी दीपक पांडे यांनी माघार घेत आपल्या पत्रामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण माफी मागतो. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे सक्षम मंत्री आहेत. तसेच महसूल विभागही चांगल्या प्रकारे काम करत आहे, असे आयुक्त पांडे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.